Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ग्रीन लातूर वृक्ष टीमने वाहीली शहिद जवानांना श्रद्धांजलि

ग्रीन लातूर वृक्ष टीमने वाहीली शहिद जवानांना श्रद्धांजलि

४ फेब्रुवारी २०१९ रोजी
पुलवामा येथे भारतीय सैनिकांच्या गाड्यावर अतिरेकी हमला झाला होता, त्यावेळी ४५ भारतीय जवान शहीद झाले होते.
शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ 
ग्रीन लातूर वृक्ष टीमने
गेल्यावर्षी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी
४५ मोठी झाडे लावली होती.
पुलवामा हत्याकांड शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ लावलेल्या ४५ झाडांचे
संगोपन कार्य करून त्यांना टँकरद्वारे भरपूर पाणी दिले.
दोन मिनिटे मौन पाळून व प्रार्थना करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, पद्माकर बागल, बाळासाहेब बावणे, सुलेखा कारेपूरकर, आशा अयाचित, महेश गेलडा, सिताराम कंजे, दयाराम सुडे, अरविंद फड, प्रा. दीपक नावाडे, अभिषेक घाडगे, कांत मरकड, कपिल काळे, भगवान जाभाडे, विजय मोहिते, बळीराम दगडे यांनी परिश्रम घेतले.


Previous Post Next Post