Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! घरफोडीतील आरोपींना 24 तासात अटक. चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असे एकूण 7 लाख 26 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त. औराद शहाजानी पोलिसांची दमदार कामगिरी*

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

घरफोडीतील आरोपींना 24 तासात अटक. 
चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असे एकूण 7 लाख 26 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त. 
औराद शहाजानी पोलिसांची दमदार कामगिरी*

                        Download image



         याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,औराद शहाजानी येथील एक व्यापारी दि.23/07/2022 रोजी त्यांचे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. तेव्हा घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 7,26,700 रु चा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेले आहे. अशी माहिती पोलीस स्टेशन येथे मिळाली वरून गुरनं 154/2022 कलम 457 454 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
              गुन्हा उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा दिनेशकुमार कोल्हे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी गेला माल व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना देऊन तपासाची चक्री फिरवली.
               गोपनीय माहितीच्या आधारावरून मोठ्या शिताफीने आरोपी नामे
 1) बबलू उर्फ अमजद रजा शकील बेलोरे, वय 20 वर्ष 

2)सोहेल तैमूर पटेल, वय 21 वर्ष

 3) इम्रान खलीलमियां कासार बेलूरे, 19 वर्ष 
           सर्व राहणार सिंधी गल्ली, औराद शहाजानी ता. निलंगा
            यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुल केले व गुन्हात चोरलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम 50,000 रु. असे एकूण 7,26,700 रू मुद्देमाल काढून दिला आहे. 
           सदर आरोपीताकडून इतर पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडलेल्या आणखीन घरफोडी चे गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्या दिशेने गुन्ह्याचा तपास सुरू असून पुढील औराद शहाजानी पोलिस करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनेशकुमार कोल्हे पोलीस स्टेशन औराद शहाजानीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी कौशल्य पूर्वक घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करून अवघ्या 24 तासात गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल 100% रिकव्हर केला. तसेच औराद शहाजानी पोलिसांनी मागील तीन दिवसात चोरी व घोरपडीच्या गुन्ह्याचा तपास लावून एकूण 16 लाख रुपये चा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींना अटक केलेली आहे.
        सदर कामगिरी दिनेशकुमार कोल्हे,उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा यांचे मार्गदर्शनात सपोनि संदीप कामत ,पोउपनि गोपाळ शिंदे, पोलीस अंमलदार स्वरूप धुमाळ, गोपाळ बरडे, श्रीनिवास चिटबोणे, मनोजकुमार मोरे, लतीफ सौदागर, तानाजी टेळे, विश्वनाथ डोंगरे ,रवींद्र काळे ,अली शेख, महिला पोलीस आमदार भाग्यश्री माळकर, भाग्यश्री ठोकरे, भाग्यश्री गिरी यांनी केली आहे.
              पोलीस स्टेशन औराद शहाजानी कडून सर्व नागरिकांना व व्यापारी संघ यांना अवाहन करण्यात येते की येते की, बाहेरगावी जाताना आपली मौल्यवान चीज वस्तू दागिने रोख रक्कमेची सुरक्षितेची काळजी घ्यावी. तसेच आपले दुकानातील कामगारांची चारित्र्य पडताळणी करूनच कामावर ठेवावे.


Previous Post Next Post