गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह 7 लाख 37 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत....
स्थानिकक गुन्हे शाखा लातूर ची कामगिरी
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या घरफोडी व चोरी चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या.
त्याप्रमाणे विवेकानंद पोलिस स्टेशनला घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दिनांक 23/07/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय व विश्वासनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे विवेकानंद चौक च्या हद्दीतील घरफोडी मधील आरोपी अंबाजोगाई येथील असल्याचे समजले. त्यावरून बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले असता घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बीड जिल्ह्यातीलच असल्याचे निष्पन्न झाले .
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ अंबाजोगाई येथे रवाना झाले. व गुन्ह्यातील संशयित आरोपी चा शोध घेतला असता ते अंबाजोगाई ते परळी जाणारे रोडवरील शेपवाडी गावाजवळील आराध्या हॉटेल च्या पाठीमागे बसलेले असल्याचे समजले. पथकाने आराध्या हॉटेल च्या पाठीमागून तीन इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे
1) लखन उर्फ अमरदीप दशरथ जोगदंड, वय 29 वर्ष, राहणार साठे नगर, परळी वेस अंबाजोगाई, सध्या राहणार काळेवाडी, थेरगाव गावठाण चांदणी चौक, बापूजी युवा मंदिर जवळ, पिंपरी चिंचवड, पुणे.
2) किशोर उर्फ पप्पू काशिनाथ जोगदंड, वय 39 वर्ष, राहणार साठे नगर ,परळी वेस, अंबाजोगाई.सध्या राहणार लोणी काळभोर, कोळपे वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे.
3) प्रवीण उर्फ डॉण्या चंद्रकांत माने, वय 31 वर्ष, राहणार शेपवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड.
असे असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या आणखीन दोन साथीदारासह 20-15 दिवसापूर्वी लातूर येथील औसा जाणारे रिंगरोडच्या डाव्या बाजूस असलेल्या एका कॉलनीमधील बंद घराचा कडीकोंडा तोडून चोरी केली असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्याकडून चोरलेल्या मुद्देमाला पैकी काही रक्कम व मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 7 लाख 37 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आहे.
पोलीस ठाणे विवेकानंद चौक गुनाराष्ट्र क्रमांक 404/ 2022 कलम 454, 457, 380, भादवी मधील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक सय्यद हे करीत आहेत.
वर नमूद गुन्ह्यातील आरोपींना मा. प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दिनांक 28/07/ 2022 पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, सचिन द्रोणाचार्य, पोलीस अमलदार अंगद कोतवाड, रवी गोंदकर, खुर्रम काझी, विनोद चिलमे, नवनाथ हसबे, राजेश कंचे, राजू मस्के, तुराब पठाण, नितीन कटारे, प्रमोद तरडे, जमीर शेख, दिनेश देवकते, नकुल पाटील,यशपाल कांबळे, माधव बिलापट्टे ,सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक बेले, एपीआय सुरज गायकवाड ,पोलिस अंमलदार गणेश साठे ,संतोष देवडे ,शैलेश सुडे, यांनी केली.