Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नाईट पेट्रोलिंग दरम्यान अटक. चोरीच्या 7 मोटारसायकलीसह 3 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त. अहमदपूर पोलिसांची नाईट पेट्रोलिंग दरम्यान उत्कृष्ट कामगिरी.


 मोटारसायकल  चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नाईट पेट्रोलिंग दरम्यान अटक.
चोरीच्या  7 मोटारसायकलीसह 3 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त. 
अहमदपूर पोलिसांची नाईट पेट्रोलिंग दरम्यान उत्कृष्ट कामगिरी.




             याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये होणारे चोरी व घरफोडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळेस नाईट पेट्रोलिंग व अचानक नाकाबंदी चे आयोजन करून वाहनांची व संशयास्पद इसमांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. 
             त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री. बलराज लंजिले यांचे सूचना व मार्गदर्शनात अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीत नाईट पेट्रोलिंग सुरू होती.      
                दिनांक 22/07/2022 मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक इसम त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ढकलत लातूर रोड वरील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना पेट्रोलिंग वरील पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली केव्हा तो भांबावून गेला. त्याला मोटरसायकलसह पोलीस ठाणेला आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव 
सुनील बाबुराव धोत्रे, वय 24 वर्ष, राहणार दवन हिप्परगा, तालुका देवनी.
            असे असल्याचे सांगून सदरची मोटरसायकल कृपा सदन इंग्लिश स्कूल, लातूर येथून चोरी केलेली असल्याचे सांगितले इतकेच नव्हे तर त्याने अहमदपूर, उदगीर , गांधी चौक व विवेकानंद पोलीस स्टेशनचे हद्दीतून तसेच कर्नाटक मधून विविध ठिकाणाहून मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले.
            पोलीस ठाणे अहमदपूर येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 180/2022 कलम 379 भादवी मध्ये अटक करून उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री. बलराज लंजिले यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्री. चितांबर कामठेवाड यांचे नेतृत्वात पोलीस तपास पथकाने गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून नमूद आरोपीकडून विविध कंपन्याचे एकूण सात मोटारसायकली ज्याची किंमत 3 लाख 50 हजार रुपयाचा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
                 नमूद आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून त्याच्याकडून आणखीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहेत.
                अहमदपूर पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार यांनी सतर्क पेट्रोलिंग केल्यानेच सराईत मोटार सायकल चोरास जेरबंद करणे शक्य झाले.
               सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री. बलराज लंजिले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे अहमदपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, रामचंद्र केदार, पोलीस अमलदार सुहास बेंबडे, कैलास चौधरी, परमेश्वर वागतकर , नारायण बेंबडे, खयूम शेख, शेंडगे यांनी बजावली.
Previous Post Next Post