निलंगा येथे जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धा उत्साहात
निलंगा: शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता मातोश्री वत्सलाबाई पाटील निलंगेकर सभागृह येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा व एकदिवशी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून निवडला जाणारा लातूर जिल्ह्याचा संघ 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 19 व्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत खेळणार आहे.
निवड चाचणीचा शुभारंभ महाराष्ट्र महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे यांनी श्रीफळ फोडून केले. यावेळी महाराष्ट्र सिलबम असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी पी.वाय. आतार यांनी उपस्थितताना राज्य संघटनेच्या कार्याचा व संघटनेला असलेल्या मान्यतेच्या बाबत माहिती दिली.
नाझीम शेख( राष्ट्रीय पंच तथा प्रशिक्षक ) यांनी एक दिवशी प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षण दिले.यावेळी सिलंबम स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंनी प्रात्यक्षिके करून उपस्थित मान्यवराची दाद मिळवली. या प्रशिक्षण शिबिराला व जिल्हास्तरीय स्पर्धेला जिल्हाभरातून 114 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.निवड झालेल्या खेळाडूंना स्पर्धा समारोपणाचे अध्यक्ष महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक आर के पाचंगे यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी लातूर अर्बन अँड डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सहसचिव आर.डी. बिराजदार, आशिरा कराटेचे सचिव संतोष तेलंगे, युनिव्हर्सल पब्लिक स्कूलचे क्रीडाशिक्षक एम. एम. सय्यद, श्रीमती सुनिता शेटगर, लातूर डिस्ट्रिक्ट आदीमुराई असोसिएशनचे सचिव विक्रम गायकवाड, केळगाव जि. प. प्राथमिक शाळेचे सहशिक्षक विठ्ठल चांभारगे, पत्रकार महेश चेंगटे, विशाल जोगदंड, सह पालक व सिलंबम प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदर असोसिएशनचे कोषाध्यक्ष अमरदीप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन असोसिएशनचे सचिव के.वाय.पटवेकर यांनी मानले.