लातूर: शहरातील गंजगोलाई लगत प्रसिद्ध असलेले चापसी सायकल विक्रीचे दुकान व तुलसी मोबाईलच्या दुकानाला आज 24 जुलै रोजी रात्री 8:00 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या मध्ये चापसी सायकल दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग विझवण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या प्रयत्न करत होत्या. काही वेळानंतर ही आग आटोक्यात आणली.


ही आग नेमकी कशामुळे लागली किंवा कोणी लावली, याचे कारण समजू शकले नाही. मात्र ही आग लागल्यानंतर गंजगोलाई भागात एकच हलकल्लोळ झाला. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात होते. चापसी सायकल स्टोर्स आणि तुलसी मोबाईल दुकानदार यांच्यातील वादातून हे अग्निकांड घडल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होत होती.