गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अश्लील व्हिडीओ करून विवाहितेकडून उकळले पैसे
; शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल
लातूर : या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार अंबाजोगाई येथील दर्ग्यात गेल्यानंतर एका विवाहितेची तेथील तरुणा सोबत ओळख झाली.या ओळखीचा फायदा घेत तरूणाने तिच्यावर लैंगीक अत्याचार करुन त्याचा अश्लील वीडियो तयार केला.त्या आधारे विवाहितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात झाली.व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकिस आली असुन या प्रकरणी लातूरातील वास्तव्यास असलेल्या रहिम सलिम तांबोळी याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये गुरनं. ३२६ / २२ कलम ३७६, ३७६ २६)आणि (२) (एन), ३८४, ३२३, ५०६ भादंविसहकलम ६६ ई, क, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला अटक ही करण्यात आली आहे.पुढील तपास उपनिरिक्षक निळकंठे हे करित आहेत