गुन्हेगारीचा पर्दाफाश….! highperformancegate.com/66/53/98/665398d4d53e7f00457ffb059b3547a5.js
०बीएसएनएलच्या केबल वायरवर मारला चोरट्यानी डल्ला
एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल : वायरमुळे इंटरनेट समस्या
लातूर: एमआयडीसी परिसरातील दोन नंबर बसस्टॉप ते एक नंबर बसस्टॉप दरम्यान अंडरग्राऊंड असलेले दूरसंचार विभागाचे केबल वायर चोरट्यांनी चोरले. ही घटना २२ ते २३ जुलैदरम्यान घडली.
याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दूरसंचार विभागाचे एमआयडीसी परिसरात
बीएसएनएलच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन नंबर बसस्टॉप ते एकनंबर बसस्टॉप या दरम्यान असलेले वायर अज्ञात चोरट्यांनी चोरले. या वायरची किंमत ७ लाख ८० हजार रुपये आहे. जमिनीत गाडलेले वायर चोरट्यांनी चोरल्यामुळे बीएसएनएलचे मोठे नुकसान झाले आहे. या केबलअंतर्गत ब्रॉडबैंड तसेच इंटरनेट कनेक्शनच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असे बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता बळवंत शेषेराव नाईकवाडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३७९ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे करीत