रेडिओ सिद्ध ९०.४ एफ एमचा उद्घाटन सोहळा संपन्न..!
समाजाच्या सर्वागीण विकासासाठी रेडिओचे योगदान अतिशय म्ह्त्वावाचे..!- श्री गुरुनाथ मघे
Download FREE MUSIC 🎵🎵
लातूर ; समाजाच्या सर्वागीण विकासासाठी रेडिओचे योगदान अतिशय म्ह्त्वावाचे आहे.मनोरंजनाबरोबर सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक प्रगती करिता रेडिओ महत्वाची भूमिका पार पडतो. मोबाईलच्या माध्यमातून रेडिओ सर्वदूर प्रसारित होत आहे. मनोरंजनाबरोबरच सामाजिक क्षेत्रातील सर्वागीण प्रगतीकरिता रेडिओ सिध्द वरून प्रसारित होणारे कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावणार आहे,असे प्रतिपादन रेडिओ सिद्ध ९०.४ एफ एमच्या उद्घाटना प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री गुरुनाथ मघे यांनी केले. तसेच रेडिओ सिद्ध ९०.४ एफ एमच्या भविष्यातील वाटचालीकरिता मा.मंत्री श्री अमित देशमुख व श्री शैलेश लाहोटी यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
‘शिक्षण’ हे सामाजिक प्रगतीतील मोलाचा घटक आहे,शिक्षणामधील बदलांचा आढावा घेता त्यामध्ये रेडिओचे देखील योगदान महत्वपूर्ण ठरत आहे,शालेय शिक्षण घेण्यासाठी विध्यार्थाना व्यक्तिमत्व विकास, उच्चारण,विविध गोष्टींचे सखोल ध्यान आत्मसात करण्यासाठी व प्रसार माध्यमांची ओळख होण्यासाठी रेडिओ माध्यम महत्वपूर्ण आहे,असे मत यावेळी बोलताना Latur pattern चे जनक श्री अनिरुद्ध जाधव यांनी व्यक्त केले.
रेडिओ सिद्ध वरून मनोरंजनाबरोबरच आरोग्य,महिला सबलीकरण,करिअर मार्गदर्शन,कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम, श्रोत्यांच्या सहभागावर आधारित फोन- ईन कार्यक्रम,शालेय विद्यार्थांच्या सहभागावर आधारित कार्यक्रम त्याचबरोबर प्रेरणादायी मुलाखतींचे प्रसारीत केले जाणार असून त्याचा लातूर करांनी श्रवणीय आनंद घ्यावा असे आवाहन रेडिओ सिद्ध ९०.४ एफ एमच्या संचालिका सौ.सरिता सोळंके यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी श्री श्रीनिवास सोळंके, श्री सचिन देशमुख उपस्थित होते.