गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
विशेष पथकाची अकोटफैल येथे जुगारावर धाड*
अकोला/ जिल्हा प्रतिनिधी
डॉ संजय चव्हाण
अकोला अकोट फैल
२९/०७/२०२२ रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या आदेशाने विशेष पथक अवैध धंद्यावर रेड करण्या कामी अकोला शहरात प ेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दारकडून खात्रीलायक बातमी मिळाली की काही इसम अकोट फैल शाळा नंबर १८ जवळ अवैध रित्या वरली जुगांराच्या आकडयावरी पेश्याने हार जीत लावून जुगार खेळत आहे तेथे पाहणी केली असता पाच लोक जुगार खेळताना मिळून आले १)संदीप मोतीगिर गोसावी वय ३० रा बाबुळगाव जि अकोला २)शेख अमीर शेख आमत वय ६० रा ३)राजेंद्रसिंह घोरांसिंह टाणक वय ३३ रा सरकारी गोडाऊन माघे खदान ४)मो इलियास मो हारून वय ३३ रा इनामदार पुरा टिळक रोड ५)उमेश मोहन चौधरी वय ५८ रा दमानी हॉस्पिटल माघे त्यांच्या जवळून २ मोबाईल ११,००० रू किंमत व कॅश ५,३८० रू असा एकूण १६,३८० रू चा मुदेमाळ जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध पो स्टे अकोट फैल येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
*सदर कारवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकांनी केली*