अंध पती पत्नीवर प्राणघातक हल्ला
प्राणघातक हल्ल्यात,एकाचा खून तर एक गंभीर
अकोला /प्रतिनिधि
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे एका दिव्यांग दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन जोडप्यातील दिव्यांग पत्नी जागीच ठार झाली तर दिव्यांग पती गंभीर जखमी झाला. त्यास हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार हे भीषण हत्याकांड कौटुंबिक वादातून झाल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर आंधळ्या मुलाची आई आणि मोठा भाऊ घरून तेल्हाराच्या दिशेने फरार झाले होते याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड आणि राजू उर्फ गजानन इंगळे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फरार झालेल्या दोन्ही आई मुलांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. हिवरखेड येथे पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. मृतक महिलेचे नाव सत्यभामा शांताराम कंडारे वय अंदाजे 28 व गंभीर जखमी युवकाचे नाव शांताराम कंडारे वय अंदाजे 30 आहे. घटनास्थळी एस,डी ,पी ओ, पोलीस अधिकारी रितू खोकर मॅडम दाखल झाले असुन हिवरखेड पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.