१० वी CBSE बोर्ड परीक्षेत राजा नारायणलाल लाहोटी (CBSE) इंग्लिश स्कूल सलग १० व्या वर्षी १००% निकालासह उज्वल यश
-सुनेत्रा बळवंतराव सूर्यवंशी ९८ % सह प्रथम, ९०% पेक्षा अधिक २९ विद्यार्थी
लातूर
CBSE च्या AISSE – २०२१ या इ. दहावी च्या परीक्षेत राजा नारायणलाल लाहोटी (CBSE) इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सलग दहाव्या वर्षी १००% निकालासह तब्बल १२ विद्यार्थ्यांनी ९५% पेक्षा जास्त तर १७ विद्यार्थ्यांनी ९०%पेक्षा गुणांसह आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
या विद्यालयातून एकूण ८० विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षा दिली पैकी ९५% पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु सुनेत्रा सूर्यवंशी ९८.००%, ओम शेळके ९७.८०%, इशिता सोनी ९७.६०%, जान्हवी मोदाणी ९७.६०%, वेदांत हलकुडे ९७.००% अजिंक्य देशमुख ९६.८०% अर्श साठे ९६.००% ओमकार वैरागकर ९५.६०% तेजस जोशी ९५.४०% तनिष्का डोके ९४.६०% प्रगती गजरे ९४.६०% गौरी नरहरे ९४.६०% आस्था जैन ९४.४०% यशवर्धन साठे ९४.४०% श्रेया पाटील ९४.२०% पोलीशेट्टी हरीकृष्णा ९४.२०% सोहम भराडीया ९४.००% अनिकेत खंडेलवाल ९३.८०% आदित्य पाटील ९३.८०% देविका देशमुख ९३.६०% नुपूर तापडिया ९३.६०% ओमकार बनसोडे ९२.८०% नेतल राठी ९२.६०% राधिका मुंदडा ९२.४०% वेदांत केंद्रे ९२.२०% विराज शिंदे ९०.६०% वैष्णवी सोनी ९०.४०% आयुषी कुलकर्णी ९०.००% आदी उत्तीर्ण झाले. तर ८० ते ९० % घेणाऱ्या विद्यार्थांमध्ये २६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
एकूण परीक्षार्थी पैकी या निकालात तब्बल 35% विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक तर ७०% विद्यार्थी ८०% पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण आहेत . सर्व विद्यार्थी तथा शिक्षकांचे श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशकुमारजी लाहोटी, विश्वस्त अध्यक्ष श्री लक्ष्मिरमणजी लाहोटी, सचिव श्री आशिषजी बाजपाई, विद्यालयाचे चेअरमन श्री आनंदजी लाहोटी, उपाध्यक्ष, श्री राजेंद्रकुमार मालपाणी, दिनेश इंनानी कोषाध्यक्ष श्री ईश्वरप्रसाद डागा, श्री शरदकुमार नावंदर, श्री हुकुमचंद कलंत्री डॉ श्री अनिलजी राठी, श्री कमलकिशोरजी अग्रवाल, श्री चैतन्यजी भार्गव, प्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलू यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस
शुभेच्छा दिल्या.