Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मौजे चांडेश्वर शिवारात जुगारावर छापा. जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 1 लाख 45 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. 11 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.*


गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
मौजे चांडेश्वर शिवारात जुगारावर छापा. जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 1 लाख 45 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. 11 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.,लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी माझा लातूर परिवार पुढाकार घेणार,साहेब...यांना गोळया घाला.. तिन जनांनी केला सामूहिक बलात्कार प्रकरण : एसआयटीकडे वर्ग दोघा नराधमांना पोलिस कोठडी तर एक जन फरार,Iमहागाई नियंत्रणात आणण्यासाठी पॅकेज घोषित करा,वझीरेक्स क्रिप्टो कंपनी ची ६४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने गोठवली ,शिवसेनेला 'धनुष्यबाण' चिन्हा बाबत दिलासा अपात्रतेच्या याचीकेवर सोमवारी सुनावणी,‘
 मौजे चांडेश्वर शिवारात जुगारावर छापा. 
जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 1 लाख 45 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत.
 11 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.*

  
         या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.
          त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वात *"दिनांक 06/08/2022 ते 08/08/2022 पर्यंत अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम"* राबविण्यात आली होती.
          सदर मोहिमे अंतर्गत जुगार कायदा, दारूबंदी कायदा, जीवनाशक्य वस्तू अधिनियम प्रमाणे कार्यवाही करून जिल्हाभरात विविध पोलीस स्टेशनला केवळ 3 दिवसात एकूण 156 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
          तसेच दिनांक 07/08/2022 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण श्री.सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे लातूर ग्रामीण हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
          सदर मोहीम अंतर्गत पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना पथकास मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाणे लातूर ग्रामीण हद्दीतील मौजे चांडेश्वर शिवारातील एका ठिकाणी छापा मारून, स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आलेले इसम नामे 
888
1) शंकर खंडेराव शितळकर, राहणार सुळ गल्ली, लातूर.

2) सिद्राम गणपत साठे, राहणार गवळीनगर, लातूर.

3) दीपक सुभाष सुरवसे, राहणार सुळ गल्ली, लातूर.

4) ज्योतीराम शहाजी काळे, राहणार हत्ते नगर, लातूर.

5) इब्राहिम अन्वर शेख, राहणार तेली गल्ली, लातूर.

 6) अल्फर झहीर शेख, राहणार राम गल्ली, लातूर.

 7) निशिकांत गणेश उडगे, राहणार आझाद चौक, लातूर.

 8)दशरथ प्रभू देवकते, राहणार खडक हनुमान, लातूर.

9) एजाज मोहम्मद हुसेन, राहणार तेली गल्ली, लातूर.

10) लखन सुरनर,राहणार धनगर गल्ली, लातूर. 
व एक अनोळखी फरार इसम

                  यांच्यावर पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 170/2022 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 01लाख 45 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन लातूर ग्रामीणचे पोलीस अमलदार हे करीत आहेत.
                सदरची विशेष मोहीम यानंतरही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
Previous Post Next Post