Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 500/- रुपयाचा दंड.

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

  बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 500/- रुपयाचा दंड.
             

  
            या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 30/01/2017 रोजी पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे पीडित मुलीच्या नातेवाईकाने तक्रार दिली की,नमूद गुन्ह्यातील आरोपीने पीडित अल्पवयीन मुलगी नमूद गुन्ह्यातील आरोपीच्या मुलीसोबत खेळण्यासाठी तिच्या घरी गेली असता नमूद आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. वगैरे फिर्याद वरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 33/2017 कलम 376(i)(J) भा. दं. वि. सहकलम 4, 5(m), 6 (POCSO) बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम-2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
             सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक माधवी मस्के व महिला पोलीस उपनिरीक्षक उमाप, पोलीस उपनिरीक्षक इंगेवाड यांनी गुन्ह्याचा बारकाईने तपास करून साक्षीदाराकडे सखोल विचारपूस करून आरोपी विरुद्ध भरपूर सबळ व भौतिक पुरावे गोळा करून मा.विशेष सत्र न्यायालय (POCSO) लातूर. येथे आरोपीविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
            सदर दोषारोपत्रा मध्ये आरोपीविरुद्ध भरपूर पुरावे असल्याने मा.विशेष सत्र न्यायाधीश श्री.बी.सी. कांबळे यांनी आरोपी नामे अमोल उर्फ रत्नाकर बाबुराव प्रयाग, वय 50 वर्ष, याला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 500/- रुपयांचा दंड सुनावला आहे.
    888          
नमूद गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात तत्कालीन तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक माधवी मस्के, महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगेवाड यांनी गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून आरोपीस शिक्षा घडवून आणली.
                   तसेच सध्या ट्रायल मॉनिटरिंग सेल येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस अमलदार ज्योतीराम माने, महिला पोलीस अंमलदार शितल आचार्य तसेच पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले परिश्रम घेतले. सरकार पक्षातर्फे एड.मंगेश महिंद्रकर यांनी बाजू मांडली. 
                मा.न्यायालयाच्या या न्याय निवाड्यामुळे महिला व बालका सोबत गैरवर्तन करणारे अपप्रवृत्तींना जबर चपराक बसली आहे.
Previous Post Next Post