लातूर मधील 150फुट स्तंभ, तिरंगा ध्वजविना एकटाच उभा -रोज फडकत नाही
कारण ऐकले तर अचंभित व्हाल..!
लातूर-तिरंगा ध्वज पाहून लातूरकर व जिल्हावासियांमध्ये देशभक्ती वाढीस लागावी म्हणून लातूर मध्ये क्रिडा संकुलात शासनाचा लाखों रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या दीडशे फूट उंचीच्या स्तंभावर तिरंगा ध्वज शानदार फडकत होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून तेथे तिरंगा फडकत नसल्याचे दिसत आहे. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी खुलासा करीत, दररोजच्या ध्वजारोहणासाठी लागणारी आर्थिक तरतूदच त्यांच्याकडे नसून,या स्तंभावर तिरंगा फडकावणे बंद करण्यामागे ध्वजाचे पावित्र्य जपण्याचेही कारण पुढे केले आहे.यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चारच राष्ट्रीय सणादिवशीच या स्तंभावर तिरंगा फडकावावा, असे आदेशित केल्याचेही त्यांनी सांगितले.
वास्तवीक पाहता संपुर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दि १३ ते १५ ऑगस्ट साजरा करत आहे.हर घर तिरंगा चे देशात नारे वाहत आहे, मात्र लातूर मधिल संवेदन शुन्य अधिकारी एका स्तंभावर करोडो रुपये खर्च करुन देशाचा अभिमान असलेल्या ध्वजासाठी मात्र यांच्याकडे तरतुद नाही,आणि आपले जिल्हाधिकारीही त्यास सहमती देवून चारच राष्ट्रीय सणादिवशीच या स्तंभावर तिरंगा फडकावावा, असे आदेशित करतात याच्या एवढे दुर्दैव्य लातूर करांचे दिसत नाही.जिल्हा क्रिडा संकुलात महत्वाच्या जागा लाखों रुपये भाडे घेवून लिज वर देण्यात आल्या आहेत एवढेच नाही तर क्रिडा संकुलाच्या आजुबाजुला भेळचे गाडे,रसवंती,आमलेटवाला यांच्याकडूनही महिन्याला भाडे वसुली करत आहेत,हे माननिय जिल्हाधिकार्यांना दिसत नाही का..?असा संतप्त सवाल उठत आहे.
ज्या कारणासाठी जागा लिए वर देण्यात आली होती त्या कारणासाठी जागा न वापरता त्याठिकाणी आलिशान हेल्थक्लब टाकण्यात आले आहे, वास्तवीक पाहता हि जागा रिहेबिलेशन सेंटर साठी देण्यात आली आहे.आता तर त्याठिकाणी होटेल ही टाकण्यात आले आहे.हे जिल्हा क्रिडा अधिकारी यांना समजत नाही का?अशी जोरदार चर्चा लातूर शहरामध्ये होवू लागली आहे.मग लाखोंरुपये स्तंभासाठी खर्च केला,लाखोंरुपये भाडेही क्रिडासंकुल वसुल करते मग देशाच्या आणि लातूरकरांची शान असलेल्या ध्वजासाठी आर्थिक तरतुद का नाही?या गंभीर विषयावर मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळीच लक्ष घालून रोज तिरंगा ध्वज फडकवत रहावा याची काळजी घ्यावी अशी माफक आपेक्षा लातूरची जनता करत आहे.