पुर्व भागात खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्याकडून 40 लाखाचा निधी
लातूर-लातूर मधील पुर्व भागात विविध विकास कामासाठी खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्याकडून 40लाखाचा निधी मंजूर करण्यात आला या कामाचा लोकार्पण भाजपाचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते रविवार दि 28ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आला.या शभारंभ प्रसंगी भाजपा जिलाध्यक्ष गुरूनाथ मग्गे, प्रेरणादाई होणराव,मनिष बंडेवार,किशन बडगीरे,संजय सोनकांबळे व पुर्व भागातील समस्त रहिवासी मोठ्यासंखेने उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार सुधाकर श्रृंगारे म्हणाले की,भाजपा। जातीवादी पक्ष नसुन सर्व समाजाला घेवून चालणारा पक्ष आहे. आमच्या पक्षाने आत्तापर्यंत 10हजार करोड रुपयांचे विकास कामे हाती घेतले आहेत त्यामध्ये इंदापुर बार्शी लातूर हा चारपदरी हायवे असुन ,औसा नांदेड़ एक्सप्रेस हायवे हा लवकरच पुर्ण होणार आहे परंतू काॅंग्रेसने मात्र आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचे काम केले आहे.त्यामुळे भाजपा हा पक्ष हमेशा आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगीतले.