गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
चोरीस गेलेल्या कार व एक मोटारसायकलसह 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
01आरोपी अटक. दोन चोरीचे गुन्हे उघड. पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण कारवाई.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे येऊन नमूद गुन्ह्यातील फिर्यादीने त्याच्या मालकीची स्विफ्ट डिझायर गाडी दिनांक 21/07/2022 रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने उदगीर ते बिदर जाणारे रोड वरून चोरून नेली आहे. वगैरे फिर्याद वरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 336/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा उघडकीस आणने कामी श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर, श्री.अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक,लातूर, यांचे मार्गदर्शनात श्री.डॅनियल बेन,उप विभागीय पोलीस अधीकारी उदगीर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस स्टेशन स्तरावर निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वात गुन्ह्यातील अरोपीच्या शोधकामी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात केले.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, उदगीर ते बिदर जाणारे रोड वरून येथून चोरीस गेलेली स्विफ्ट डिजायर गाडी नावंदी गावात राहणाऱ्या एका इसमाने चोरली आहे. अशी माहिती मिळाली त्यावरून माहितीची शहानिशा करून पथकाने एका इसमास ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्यांचे नाव
1) आकाश उर्फ लखन दयानंद माने, वय 27 वर्ष, राहणार नावंदी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर.
असे असल्याचे सांगून नमूद स्विफ्ट डिझायर वाहन त्याने उदगीर ते बिदर जाणारे रोड वरून चोरी केल्याचे कबूल केले. आणखीन गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने उदगीर ग्रामीण येथेच दाखल असलेल्या एका मोटरसायकल चोरी मधील मोटरसायकल सुद्धा चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून आरोपीने गुन्ह्यात चोरलेल्या स्विफ्ट डिझायर व पॅशन प्रो. मोटार सायकल असा 4 लाख 50 हजार रुपयाच्या मुद्देमालसह त्याचे राहते गावातून दिनांक 03/08/2022 रोजी पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे आणून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर ग्रामीण श्री.डॅनियल बेन व पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीचा बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून गुन्हा उघडकिस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर ग्रामीण श्री. डॅनियल बेन मार्गदर्शनात पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण चे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार राम बनसोडे, राहुल नागरगोजे, तुळशीराम बरुरे ,राहुल गायकवाड, सचिन नाडागुडे यांनी केली आहे.