Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याशिवाय रस्त्याचे काम करु नये ..या मागणीसाठी पत्रकारांचे धरणे आंदोलन

मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याशिवाय  रस्त्याचे काम करु नये या मागणीसाठी पत्रकारांचे  धरणे  आंदोलन

पत्रकारांच्या आंदोलनाला  महिला विधिज्ञ यांचा पाठींबा


उदगीर (संगम पटवारी)  येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याशिवाय नालीचे व रस्त्याचे काम करु नये या मागणीसाठी चालू असलेल्या धरणे  आंदोलनाला  विधिज्ञ यांनी  आंदोलन स्थळी येत पाठिंबा  दिला .  

छञपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय पर्यंतच्या रस्त्यावरील शंभर फुटाच्या आतील आतिक्रमणे काढल्या शिवाय रस्ता व नालिचे काम करु नये या मागणीसाठी पत्रकाराच्या वतीने मागील ३६  दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन चालू आहे.  दरम्यान पत्रकारांनी   वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करत   विभागीय आयुक्त औरंगाबाद ,जिल्हाधिकारी लातूर  ,बांधकाम विभागाचे  विभागीय मुख्य अभियंता  नांदेड यांची भेट घेत पत्रकारांनी  निवेदन दिले .  बांधकाम विभागाकडून मोठा फौजफाटा आणत   आतिक्रमण  हाटवण्याचा फार्स केला . त्यामुळे पत्रकारांनी महामहिम  राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेत अतिक्रमणा संदर्भात गर्‍हाणे कानावर घालुन आंदोलना संदर्भातली कैफियत राज्यपाल यांच्यापुढे  मांडली.
 मागील ३६ दिवसात पञकारांच्या आंदोलना दरम्यान  उदगीरातील विविध सामाजिक.संघटना ,राजकिय पक्षांचे पदाधिकारी यांनी   आंदोलनास पाठींबा दर्शवला   आज उदगीर न्यायालयातील  विधिज्ञ ॲड. सरजू बलदवा ,ॲड.आख्तार बानू शेख,  ॲड.प्रेरणा गायकवाड ,ॲड.वर्षा बनसोडे, ॲड.रुक्मिणी सोनकांबळे ,ॲड. रूपा भालेराव ,  यांनी पाठींबा  आंदोलनाला पाठींबा दिला. यावेळी पत्रकार सुनिल हावा पाटील, प्रा.बिभीषण मद्देवाड,  सिद्धार्थ सुर्यवंशी,  बबन कांबळे,संगम 

पटवारी, नागनाथ गुट्टे,   सुधाकर नाईक,   बस्वेश्वर डावळे, निवृत्ती जवळे,अरविंद पत्की,  आशोक तोंडारे ,बाबासाहेब मादळे  आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post