स्वातंत्र्याचा 'अमृत महोत्सव' निमित्त लातूर पोलिसातर्फे एकता दौडचे आयोजन
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'अमृत महोत्सवा'अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यात लातूर पोलिस दलाच्या वतीने दिनांक 14/08/2022 रोजी सकाळी 7 वाजता लातूर शहरात एकता दौड आयोजित करण्यात आली आहे.
सदरची एकता दौड मध्ये लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले 400 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा समावेश असणार आहे.तसेच पोलीस ट्रेनिंग स्कूल बाभळगाव,लातूर व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणारे खाजगी इन्स्टिट्यूट मधील तरुण सहभागी होणार आहेत.सदरची एकता दौड पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथून सुरू होऊन शाहू चौक, गंजगोलाई, मज्जिद रोड, सुभाष चौक, बालाजी मंदिर ,रेणापूर नाका परत छत्रपती शिवाजी चौक, गांधी चौक,जुना गुळ मार्केट, शाहू चौक मार्गे निघून शेवटी विवेकानंद चौक येथे पूर्ण होणार आहे.
सदर एकता दौड मध्ये प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या तीन पुरुष व तीन महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सदरच्या एकता दौड मध्ये इतर नागरिक व महिला सुद्धा सहभागी होऊ शकतात.
एकता दौड मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याकरिता वाहतूक पोलिसांची तसेच चार्ली पोलीस पेट्रोलिंग कार्यान्वित करण्यात येणार येणार आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी सदरच्या दौड मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.