Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आजादी गौरव पदयात्रा

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आजादी गौरव पदयात्रा

 लातूर शहरात गंजगोलाई ते महात्मा बसवेश्वर महाविदयालय

लातूर प्रतिनिधी १० ऑगस्ट २०२२ :




  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात गंजगोलाई येथून करण्यात आली. ही पदयात्रा दयारामरोड, खडक हनुमान, आजाद चौक या मार्गाने मार्गक्रम करीत शेवटी महात्मा बसवेश्वर महाविदयालय लातूर येथे पोहोचली या ठिकाणी महात्मा बसवेश्वराचे दर्शन घेऊन, अभिवादन करून समारोप करण्यात आला. आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आल्यामुळे लातूर शहरातील वातावरण स्वातंत्र्य आंदोलन, देशभक्ती व थोर हुतात्म्यांचे बलीदानाच्या आठवणीने भारावून गेल्याचे चित्र सर्वांना पहायला मिळाले.
  भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ब्रिटीश सत्तेच्या विरूध्द मोठा लढा उभा केला. या चळवळीत अनेक नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. भारत देश १९४७ ला स्वातंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची धोरणे राबवून सक्षम, बलशाली राष्ट्र उभा केले. काँग्रेस पक्षाची सर्वधर्म समभावीची ध्येयधोरणे आखली, देशाला विकसीत केले. या लढयाचे स्मरण लोकांना व्हावे या करीता आझादी अमृत महोत्सव गौरव यात्रा लातूर शहरभर काढण्यात येत आहे.

  लातूर शहरात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. आजादी गौरव पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी गंजगोलाई येथे जंगदंबा मातेची आरती करून दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली. या नंतर सुभाष चौक, दयाराम रोड, खडक हनुमान, तेली गल्ली, पटेल चौक कॉर्नर, सूळ गल्ली, भाजी मार्केट, सेंट्रल हनुमान, आझाद चौक, औसा हनुमान, महात्मा बसवेश्वर कॉलेज येथे पोहचली, महात्मा बसवेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन, अभिवादन करून पदयात्रेचा समारोप करण्यात आले.
 या पदयात्रेत अँड. किरण जाधव, मोईजभाई शेख, अँड.समद पटेल, अँड.दीपक सूळ, सौ स्मिताताई खानापुरे, सौ.सपनाताई किसवे, अशोक गोविंदपूरकर, गोरोबा लोखंडे, विजयकुमार साबदे, अँड.किशोर राजुरे, गणपतराव बाजुळगे, इम्रान सय्यद, अँड. देविदास बोरूळे पाटील, अँड.फारुख शेख, प्रा.प्रवीण कांबळे, जालिंदर बर्डे, सुपर्ण जगताप, व्यंकटेश पुरी, दगडुअप्पा मिटकरी, युनूस मोमीन, तबरेज तांबोळी, दीप्ती खंडागळे, वर्षाताई मस्के, हमीद बागवान, कुमारप्पा पारशेट्टी, सुंदर पाटील कव्हेकर, सिकंदर पटेल, पंडित कावळे, कलीम शेख, इसरार पठाण, अरफात पटेल, अक्षय मुरळे, सुलेखाताई कारेपूरकर, स्वातीताई जाधव, शीतल मोरे, केशरताई महापुरे, शीलाताई वाघमारे, मनीषा पुंड, कमलताई मिटकरी, मीनाताई टेकाळे, मंदाकिनी शिखरे, अनिता रसाळ, अभिषेक पतंगे, अभिजित इगे, अकबर माडजे, बालाजी झिपरे, आसिफ तांबोळी, सिद्धांत कांबळे, करीम तांबोळी, महेश शिंदे, गिरीश ब्याळे, राजू गवळी, संदीपान सूर्यवंशी, विकास कांबळे, कुणाल वागज, मेनोद्दीन शेख, रणधीर सुरवसे, आबु मणियार, पवन सोलंकर, विष्णुदास धायगुडे, अँड.सुनीत खंडागळे, पवनकुमार गायकवाड, विजयकुमार धुमाळ, रोहित वारडुले, दिनेश गोजमगुंडे, जहिर शेख, अमन सय्यद, अमोल गायकवाड, धनराज गायकवाड, जाफर शेख, जफर पटवेकर, जय ढगे, युसूफ शेख, महेश कोळे, राहुल डुमने, सादिक पटवारी, इनायात सय्यद, अँड.दिनेश राइकोडे, प्रभुअप्पा इंडे, जमालोद्दीन मणियार, अशोक भंडारे, संजय सुरवसे आदी सहभागी होते.
Previous Post Next Post