दोन्ही आमदारांनी धरले नागरिकांना वेठीस
'लातूरकर' आणि आता 'औसेकर' पाण्यावाचून वंचित
लातूर शहराततच नव्हे तर जिल्ह्यात ही पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.त्यातच मा.अमित देशमुख यांनी 'उजनी' चे पाणी विसरा असे म्हटल्याऩंतर
प्रसारमाध्यमातून टिकेची झोड उटली होती आणि आता औसेकर ही पाणी टंचाईचा सामना करत आसल्याचे वास्तव समोर येत आहे.
हिंदू धर्मातील पवित्र महिना असलेल्या श्रावणमासात शहराला ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे धरणे भरून वाहत असताना मात्र लातूर कर आणि औसेकर मात्र पाण्यासाठी टाहो फोडत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
महाराष्ट्रात मागील काही महिन्यापासुन राजकिय घडामोडी घडल्यामुळे राजकिय भुकंप आला आणि त्यामध्ये चालू सरकार कोसळले.त्यावेळी सर्वच आमदार मुंबई दिल्ली वार्या करत होते.पण आता सरकार स्थापण होवून एक महिना झाला आहे तरी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदारांना वेळ मिळत नसल्यचे चित्र दिसत आहे. त्यातच येथील नगरपालिकेवर नऊ महिन्यापासून प्रशासक आले आहे.
आमदार झाल्यानंतर मी माझे घर औशात करणार असे म्हणत निवडून आल्याबरोबर आ. अभिमन्यू पवार यानी औसा शहरात घर घेतले आहे. पण दिवसाला पाणी येते हे पाहण्यास ते विसरले आहेत.किंबहुना सततच्या दिल्ली, मुंबई वार्या मुळे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.आतातर लातूरमध्येही त्यांनी आलिशान घर घेतले की काय..?असा प्रश्न आता औसेकरांच्या मनात येवू लागला आहे.
शहराला पंधरा दिवसानंतर पाणी पुरवठा होत असताना प्रभारी मुख्याधिकारी मात्र बेफिकीर दिसत आहेत, एवढ्या मोठ्या शहराला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यास त्याचा किती मोठा फटक बसत असतो है औसा शहरावरून वरून समोर येत आहे.असे पाणी टंचाईचे दुर्दैवी चित्र दिसत असून याला येथील प्रशासक व मुख्याधिकारी यांची निष्क्रीयता समोर येत आहे.
त्यातच सध्या असलेले मुख्याधिकारी हे प्रभारी चाकूरचा कारभार सांभाळत आहेत त्यामुळे याचा कारभार कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांच्यावरच आहे.शहरातील पाण्याचा प्रश्न कायम निकाली निघावा म्हणून पन्नास कोटी रुपये रोख खर्च करून माकणी पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन सुरू झाली.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहराला ही योजना मिळाली होती त्याचा | हस्ते याचे उद्घाटन करण्यात येणार होते.परंतू सततच्या नादुरस्त पाईपलाईन व ढिसाळ कारभारामुळे शहराला त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. ही योजना मंजूर करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांचाच पाठपुरावा होता. पण या योजनेचे पाणी पावसाळ्यात मिळत नसेल तर उन्हाळ्यात काय हाल होतील याची कल्पना न केलेली बरी.एकंदरीतच काय लातूर असो कि औसा पाण्यासाठी नागरिक टाहो फोडत असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांच्या नाकर्ते पणा मुळे वह पुढे येणार्या निवडणुकीसाठी लातूरकर आणि आता औसेकर पाण्यावाचून वंचित ठेवून त्यांना वेठीस धरले असल्याची आता जोरदार चर्चा शहरामध्ये होवू लागली आहे.