Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आझादी गौरव पदयात्रा

 जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आझादी गौरव पदयात्रा

आमदार अमित विलासराव देशमुख यांची उपस्थिती 


लातूर प्रतिनिधी-

  राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आजादी गौरव पदयात्रा संपन्न झाली.





 या पदयात्रेला छत्रपती शाहू महाराज चौक येथून सुरुवात झाली तर हि पदयात्रा आजम चौक, लेबर कॉलनी, गणेश मंदिर, कोल्हे नगर, मंठाळे नगर, स्क्रॅप मार्केट यार्ड या मार्गाने मार्गक्रमण करीत शेवटी महात्मा बसवेश्वर चौक येथे पद यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत तसेच लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या आजादी गौरव पदयात्रेमुळे लातूर शहरातील वातावरण स्वातंत्र्य आंदोलन, देशभक्ती व थोर हुतात्म्यांचे बलीदानाच्या आठवणीने भारावून गेल्याचे चित्र पहायला मिळाले.

  भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ब्रिटीश सत्तेच्या विरूध्द मोठा लढा उभा केला. या चळवळीत अनेक नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. भारत देश १९४७ ला स्वातंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची धोरणे राबवून सक्षम, बलशाली राष्ट्र उभा केले. काँग्रेस पक्षाने सर्वधर्म समभावाची ध्येयधोरणे आखली, देशाला विकसीत केले. या लढयाचे स्मरण लोकांना व्हावे या करीता आझादी अमृत महोत्सव गौरव यात्रा लातूर शहरभर काढण्यात येत आहे रविवारी या यात्रेचा पाचवा दिवस होता .

 

 भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरात छत्रपती शाहू चौक ते महात्मा बसवेश्वर चौक आजादी गौरव परयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, देशप्रेमी नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी आपल्या घराच्या छतावरून पदयात्रेवर पुष्पवृष्टी केली तर देशभक्तीपर घोषणांनी, परिसर दणाणून गेला होता. प्रभाग क्रमांक तीन पासून सुरु करण्यात आलेल्या या आजादी गौरव पद यात्रेचा समारोप शेवटी प्रभाग क्रमांक १८ येथे पदयात्रेचा करण्यात आला.

 यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, एड. सदस्य समद पटेल, माजी विरोधीपक्ष नेते एड. दीपक सूळ, लातूर शहर काँग्रेसचे निरीक्षक डॉ. जितेंद्र देहाडे, निरीक्षक फरीद देशमुख, माजी महापौर प्रा.स्मिता खानापुरे, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी विद्याताई पाटील, सौ. सपनाताई किसवे, सौ.स्वातीताई जाधव, सौ. पूजा पंचाक्षरी, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, सिकंदर पटेल, महेश काळे, गौरव काथवटे, मोहन सुरवसे, विष्णुदास धायगुडे, यशपाल कांबळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष हकीम शेख, युनूस मोमीन, विकास कांबळे, फैजलखान कायमखानी, प्रा. प्रवीण कांबळे, रमेश सूर्यवंशी, सुलेखा कारेपूरकर, एड. देविदास बोरुले पाटील, अविनाश बत्तेवार, अब्दुल्ला शेख, शितल मोरे, तनुजा कांबळे, केशरबाई महापुरे, राम गोरड, अथरुद्दीन काझी, तबरेज तांबोळी, आसिफ बागवान, पृथ्वीराज शिरसाट, रघुनाथ मदने, सूर्यकांत कातळे, गोटू यादव, सुपर्ण जगताप, दत्ता सोमवंशी, अभिषेक पतंगे, पप्पू देशमुख, विकास वाघमारे, बाबा पठाण, सुरज राजे, करीम तांबोळी, इमरान गोंदरिकर, हमीद बागवान, गोविंद ठाकूर, इसरार पठाण, आयुब मणियार, रविशंकर जाधव, युसुफ शेख, कैलास कांबळे, एड. फारुक शेख, अकबर माडजे, राज क्षीरसागर, बिलाल शेख, इसरार सगरे, सुंदर पाटील कव्हेकर, दिनेश गोजमगुंडे, लक्ष्मीकांत मंठाळे, विजयकुमार साबदे, प्रा. सत्यवान कांबळे, पवन कुमार गायकवाड, व्यंकटेश पुरी, वर्षा मस्के, सायरा पठाण, तनुजा कांबळे, प्रशांत देशमुख, अनिता कांबळे, आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------
Previous Post Next Post