ईडीच्या आरोप पत्रात नाव
मुंबई-खंडणी प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर यांच्या सोबती आता ईडीने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिलादेखील आरोपी केले असल्याचे आता समोर आले आहे.तिने आरोपी कडून महागड्या वस्तु भेट स्वरुपात स्विकारल्याचे कारण नमुद करण्यात आले आहे. तिचे नाव बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात समोर आले आहे. या खंडणी द्वारे उकळलेल्या पैशातून दहा कोटीच्या भेटवस्तू चंद्रशेखर यांनी जॅकलीना दिल्याचे या तपासात स्पष्ट होताना दिसत आहे.त्यामुळे तिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
सुकेश आणि जॅकलिन यांचे घनिष्ठ मैत्री होती त्याच्या अनेक गुन्ह्याची जाकलिन तिला माहिती होती . सुकेश ने त्याच्या उद्योजक पत्नीकडून 215 कोटीची खंडणी उकळण्याचे प्रकार पुढे आले होते या पैशातून सुकेश ने जाकलिन हिला सुमारे दहा कोटीच्या भेटवस्तू दिल्याचे या तपासात स्पष्ट झाले आहे तसेच चुकीच्या खंडणीच्या पैशातून आपल्या भेटवस्तू दिल्या आहेत याची देखील जाकलिन ने माहिती दिली होती त्यामुळे ती आता ईडी च्या आरोपीच्या पिंजर्यात सापडली आहे.