गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
'क्लबमधील लोकांना अमाणुष मारहाण'
चक्क..पोलिसांवरच पैशे घेतल्याचा क्लब चालकाने केला आरोप
लातूर/रेणापुर येथील क्लब वर काही दिवसापुर्वी
चाकूर येथील निकेतन सहायक कदम यांनी धाड टाकून ३९जणांना वर कायदेशीर कार्यावाही करण्यात आली होती.परंतू आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून येथून अटक करण्यात आलेल्या लोकांना अमानुषपणे मारहाण अमाणुष मारहाण केल्याची तसेच, क्लबमधील बाजुच्या रुमचे लॉक तोडून कपाटातील ८ हजार १०० घेऊन बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार क्लबचे मालक कल्याण विठ्ठलराव बदने यांनी पोलीस अधिक्षकांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, मी डिसेंबर २०२० मध्ये रेणुका क्लब असून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हा क्लब सुरू करण्यात आला आहे.
या क्लबमध्ये गैरकृत्य होवू नयेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे येथे कसलेही उल्लंघन होत नाही. असे असतानाही सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी सोमवारी क्लबवर धाड
येथील सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेला असून येथील कर्मचाऱ्यांना बेदम मारहान केली आहे. तसेच त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले असून क्लबच्या मागील रुमचे लॉक तोडून कपाटातील ८ हजार १०० रुपये काढून नेल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला