Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अतिक्रमण काढण्यासाठी सा.बांधकाम विभागाला भिक द्या

अतिक्रमण काढण्यासाठी सा.बांधकाम विभागाला भिक द्या पत्रकारांनी केले आंदोलन




उदगीर(संगम पटवारी) शहरातील छञपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील शंभर फुटाच्या आतील अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी पञकारांच्या वतीने गेल्या ४७ दिवसापासुन छञपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत धरणे आंदोलण सूरु आहे राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोशारी संभाजीनगर चे आयुक्त आयुक्त केंद्रेकर लातुर चे जिल्हाधिकारी यांना अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी वेळोवेळी निवेदने दिली माञ अद्याप पर्यंत कसलीही दखल प्रशासनाच्या वतीने घेण्यात आले नसल्याने आंदोलनाच्या ४७ व्या दिवशी आंदोलक पञकारांनी
सार्वजणीक बांधकाम विभागाला भीक द्या म्हणुन आंदोलन केले या आंदोलनास उदगीर करांनी चांगला प्रतिसाद दिला असुन भीक आंदोलनात जमलेला निधी हा उपजिल्हाधिकारी यांना सुपूर्द करण्यात येणार जोपर्यंत अतिक्रमण निघणार नाहि तोपर्यंत विविध पद्धतीचे आंदोलने करुन प्रशासनास अतिक्रमण काढण्यासाठी जाग करणार असल्याचा पवीञा आंदोलक पञकारांनी धरला आहे या आंदोलनावेळी पञकार सुनील हावा, बिभीषण मद्देवाड,संगम पटवारी, सिद्धार्थ सुर्यवंशी, अंबादास आलमखाने ,नागनाथ गुट्टे,सोनू पिंपरे, अशोक तोंडारे, सुधाकर नाईक, अरविंद पत्की ,जय मादळे ,दत्ता गायकवाड आदि उपस्थित होते.
Previous Post Next Post