जुगारावर धाड; ९ जणांना अटक
किल्लारी /
किल्लारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लामजना येथे तिर्रट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरुन पोलिसांनी शनिवारी दुपारी अचानक धाड टाकली. यात जुगाराच्या साहित्यासह १६५० रुपये जप्त करण्यात आले.
गेल्या आठ दिवसापासून किल्लारी पोलिसांनी अवैध धंद्यावर धाडसत्र चालू केले आहे. त्यातच लामजन्यात जुगार चालत असल्याची माहीत मिळाल्याने सपोनि. सुनिल गायकवाड व पि.एस.आय. प्रशांतसिंह राजपूत यांनी पथक तयार करुन धाड टाकली व रोख रकमेसह ९ जणांना गजाआड केले. यात तात्याराव सरवदे (वय ५६), रामदास रसाळ (वय २०), महादेव फुलारी (वय ३२), वर्षसिंग सगर (वय ३६), संजय सरवदे (वय ४४), अजय गवळी (वय २८), उत्तम कांबळे (वय ५०), आंतेश्वर सरवदे (वय ३०), गौस शेख (वय ३६) यांचा समावेश असून पुढील तपास एच.सी.मरडे करीत आहेत.