Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पोलिसांची हैवानियत.. साहेब..... मारहाणचं करायची आहे तर लायसन्स देता कशाला..?

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

पोलिसांची हैवानियत..
साहेब..... मारहाणचं करायची आहे, तर लायसन्स देता कशाला..?


लातूर/रेणापुर येथील क्लब वर काही दिवसापुर्वी 
 चाकूर येथील डि वाय एस पी निकेतन कदम यांनी धाड टाकून ३९जणांना वर कायदेशीर कार्यावाही करण्यात आली होती.परंतू आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे, या कार्यवाही मध्ये क्लब मधील खेळणार्यांना अक्षरश:सोलून काढले आहे. येथून अटक करण्यात आलेल्या लोकांना अमानुषपणे मारहाण केल्याची बातमी संपुर्ण महाराष्ट्रात वार्यासारखी पसरली एवढ्यावरच साहेब थांबले नाहित तर क्लबमधील बाजुच्या रुमचे लॉक तोडून कपाटातील ८ हजार १०० ही बंदुकीचा धाक दाखवून घेऊन गेले व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार क्लबचे मालक कल्याण विठ्ठलराव बदने यांनी पोलीस अधिक्षकांकडे एका लेखी निवेदनाद्वारे१८ आगस्ट रोजी दिली.
हा क्लब जिल्हाधिकारी यांच्या परवाणगीने २१/१२/२०२० पासून रेणुका क्लब या नावाने सुरु आहे.या क्लब ला ८टेबल परवानगी देण्यात आली आहे.एका टेबलवर ४ प्रमाणे ३२जन खेळू शकतात. परंतू लाॅकडावून व घरगुती कारणाने हा क्लब १/०६/२०२२ पासून सुरु केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या क्लबमध्ये गैरकृत्य होवू नयेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे येथे कसलेही उल्लंघन होत नाही. असे असतानाही सीसीटीवी चा डीव्हीआर काढून,पुन्हा येशील का म्हणत,......वरचे सालटे निघेपर्यंत मारहाण केली व या मारहाण झाल्याचे फोटो ही व्हायरल झाली.या अधिकार्याची एवढी धसकी खेळणार्यांमध्ये बसली कि,
साहेब..... मारहाणचं करायची आहे तर लायसन्स देता कशाला अशी ओरड आता होवू लागली आहे.
या प्रकरणी निकेतन कदम यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी, मुख्यमंत्री,आय जी,डीजी यांच्याकडे मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
Previous Post Next Post