गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लॉजवर जुगार खेळताना पोलिसांची धाड
जुगाराचे साहित्यासह २५ हजार रोख रक्कम जप्त
उदगीर/प्रतिनिधि संगम पटवारी
शहरातील एका लॉजवरील बंद रूम मध्ये जुगार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर या अड्डयावर पोलिसांनी छापा मारून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम २५ हजार नऊशे रुपये जप्त केले. जुगार खेळणाऱ्या तिघाविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भोसले कॉम्प्लेक्समधील साई रेसिडेन्सी लॉज मधील रूम नं. ११७ मध्ये पत्त्यावर पैसे लावून जुगार सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत शहर पोलिसांना मिळाल्यावरून.उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घरझडती वॉरंट घेतले. सोबत दोन पंच आणि हवालदार चीमोले, पो. ना. विष्णू गुंडरे, गजानन पुल्लेवाड, पोलीस शिपाई बबन चव्हाण यांच्यासह साई रेसिडेन्सी लॉज मधील रूम न. ११७ मध्ये छापा मारला. यावेळी आरोपी अन्वर बाबुमिया मनियार (रा. क्रांतीनगर निडेबन), असलम हुसेनसाब मनियार (रा. ह. मु. नूर पटेल कॉलनी, उदगीर) आणि इब्राहिम अब्दुल रजाक मनियार (रा. किल्ला गल्ली उदगीर) हे तिघे जुगार खेळताना आढळले. याप्रकरणी पोलिस नाईक विष्णू गुंडरे यांच्या फिर्यादीवरून तिघा यावरून सपोनि गायकवाड यांनी याबाबतची माहिती आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.