Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आपण यांना पाहिलात का..? मुलगा हरवला आहे

आपण यांना पाहिलात का..?
मुलगा हरवला आहे
कोणाला काही माहिती असेल तर पोलीसांना कळविण्याचे आवाहन

 


लातूर,दि.11(जिमाका)- किशन मोरप्पा मादळे वय 72 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार नावंदी ता. उदगीर जि. लातूर मो.नं. 8975279010 यांनी पोलीस स्टेशनला येवून फिर्याद दिली. की फिर्यादी यांचा मुलगा व सुन मयत झाल्याने त्यांचे दोन्ही मुलं एक शुभम वय 20 वर्ष व दुसरा सुमित वय 17 वर्ष फिर्यादी हेच सांभाळ करत असतात. यातील सुमित हा मतिमंद असून तो दि. 17 जुलै 2022 रोजी 9 वाजता उदगीर येथे कामासाठी जातो म्हणुन गावातील कृष्णा वाघमारे यांचे ॲटोत बसून गेला. त्यानंतर ॲटोवाल्याकडे व नातेवाईकाकडे आज पावतो शोधाशोध केली परंतु आज पावतो तो मिळून आला नाही. त्या संदर्भातील गुन्हा दाखल असून त्या बालकाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.

नाव- सुमित धोंडिराम मादळे, उंची- 5 फुट 4 इंच अंदाजे, रंग-सावळा, डोळे-मध्यम, केस-काळे व रंगवुन ब्राउन केलेले.पोशाख- पँन्ट-शर्ट व इतर वर्णन एक समोरील वरच्या बाजुचा दात पडलेला असून मतिमंद आहे. असे पोउपनि / पोस्टे वाढवणा मो.नं. 9767346418 यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 
Previous Post Next Post