Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भारतात २१ बोगस विद्यापीठे

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
भारतात २१ बोगस विद्यापीठे 
 विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचा-यूजीसीचा इशारा



 विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शुक्रवारी देशातील २१ विद्यापीठे बोगस घोषित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील बहुतांश विद्यापीठे दिल्ली व उत्तर प्रदेशातील आहेत. या विद्यापीठांत प्रवेश घेऊ नये, असा इशारा यूजीसीने विद्यार्थ्यांना दिला आहे.

यूजीसी कायद्याचे उल्लंघन करू सुरू असलेल्या किमान २१ स्वयंघोषित, मान्यता नसलेल्या संस्थांना बोगस विद्यापीठे म्हणून घोषित करण्यात आले असून, त्यांना कोणतीही पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही, असे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी स्पष्ट केले. यूजीसीने बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.
दिल्लीत सर्वाधिक आठ विद्यापीठे बोगस

 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, कमर्शियल युनिव्हर्सिटी लि. दरयागंज, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर सेंट्रिक जुरिडिशियल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि अध्यात्मिक विश्वविद्यालय.
उत्तर प्रदेशातील बोगस विद्यापीठे 
गांधी हिंदी विद्यापीठ, इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स सुभाष चंद्र बोस युनिव्हर्सिटी (ओपन युनिव्हर्सिटी), भारतीय शिक्षा परिषद.
अन्य बोगस विद्यापीठे 

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ  होमिओपॅथी, नेताजी
बदागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी (कर्नाटक), सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी (केरळ), राजा अरेबिक युनिव्हर्सिटी (नागपूर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन अँड रिसर्च (कोलकाता), नवभारत शिक्षा परिषद आणि नॉर्थ ओडिशा युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉजी (ओडिशा), श्री बोधी अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (पुदुचेरी) आणि ख्राईस्ट न्यू टेस्टामेंट डिम्ड युनिव्हर्सिटी (आंध्र प्रदेश)

Previous Post Next Post