Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मधील एल.जी. शोरूम फोडले.. लाखों चा माल लंपास.

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

सायकल चोरणार्यापासुन ते आता शोरूम फोडणार्यांपर्यंत सर्वच चोर सक्रिय..

लातूर मधील एल.जी. शोरूम फोडले.. लाखों चा माल लंपास.



लातूर:लातूर शहरामध्ये सायकल चोरणार्यापासुन ते आता शोरूम फोडणार्यांपर्यंत सर्वच चोर सक्रिय झाल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास औसा रोड येथे चोरट्यांनी अतिशय शिताफीने लातुरातील एल जी शोरुम फोडून चक्क २५ लाखांवर साहित्य पळविल्याची धक्कादायक घटना घडली आणि शहरामध्ये एकच खळबळ उडाली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत मिळालेल्या माहिती नुसार,शनिवारी पहाटे ४ ते ५ दरम्यान औसा रोडवर एलजीचे शोरुम अज्ञात चोरट्याच्या टोळीने शोरूमचे शटर उचकटून प्रवेश केला.शोरुम फोडण्यापूर्वी चोरट्यांनी शोरुम, बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे विरुद्ध दिशांना वळविले. शोरुमसमोरच टेम्पो उभा केला आणि टीव्ही, मायक्रोव्हेव, वॉटर प्युरीफायर यासह अन्य साहित्य, रोख रक्कम ३२ हजार असा २५ लाख ४५ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.शिवाय, शोरुममधील साहित्य लंपास करताना सीसीटीव्हीचा डीव्हीआरही त्यांनी पळविला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
घटनास्थळी तातडीने श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, ठसे तज्ज्ञालाही बोलावण्यात आले होते. हे दोन्ही पथक चोरट्याचा माग काढत असून, विविध पोलीस पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. याच्या तपासाचे सध्याला पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे.

Previous Post Next Post