Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मीरा भाईंदर शहरात विविध ठिकाणी आसलेल्या दहीहंडी महोत्सवांना मुख्यमंत्र्यांची उपस्थिति

मीरा भाईंदर शहरात विविध ठिकाणी  आसलेल्या दहीहंडी महोत्सवांना मुख्यमंत्र्यांची उपस्थिति



मीरा भाईंदर शहरात विविध ठिकाणी  आसलेल्या दहीहंडी महोत्सवांना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या गोविंदांचा उत्साह वाढवला. 


मीरा भाईंदर मीरा भाईंदरच्या आमदार सौ.गीता जैन, मीरा भाईंदर महानगरपालिकेतील नगरसेवक विक्रम प्रताप सिंह तसेच #नवघर गावातील #काशीनगर येथील नगरसेवक विकास पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून गोविदांशी संवाद साधला. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच मीरा भाईंदर शहरात येत असल्याने ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सत्काराचा विनम्रतापूर्वक स्वीकार केला. 
याप्रसंगी आमदार सौ.गीता जैन, आमदार प्रताप सरनाईक, नगरसेवक विक्रम प्रताप सिंह, मीरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष रवी व्यास, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, नगरसेवक विकास पाटील, त्यांच्या पत्नी वंदना पाटील, मुलगा स्वराज पाटील तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक तसेच गोविंदा पथके मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Previous Post Next Post