गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गोवंश जनावर गाय, बैल, बकरी इ पाळीव प्राण्याची तस्करी करणार्या दोघांना अटक
जनावरासह ६ लाख ४०हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांची कारवाई
अकोला- जिल्हयात विधिध ठिकाणी घडलेल्या शेतक-यांचे गोवंश / पाळीव प्राणी यांची मोठया प्रमाणावर चोरी होत असल्याने गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर साहेब, अकोला मार्गदर्शक सुचना दिल्याने सदर गुन्हयाचा तपास करीत असताना संतोष महाल्ले पोलिस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा यांना गोपनिय माहीती मिळाली की, बिहाडमाथा महान ता. बार्शीटाकळी येथील दोन इसम रात्री तवेरा वाहनातुन जनावर चोरी करून कत्तल करून विक्री करीत आहे अशा माहीती वरून १) शेख इफराज शेख शकील वय २६ वर्षे रा. बिहाडमाथा महान ता. बार्शीटाकळी २) शेख फिरोज शेख बिरमीला वय ३८ वर्षे रा. शिवणी खदान, अकोला सध्या रा. बिहाडमाथा महान ता. बार्शीटाकळी यांनी विविध ठिकाणी गोवंश जनावर चोरी केल्याचे निष्पण झाल्याने त्यांना विचारपुस केली असता मागील ४-५ महीण्यापासुन त्यांचे कडे असलेली तवेरा वाहन क्रमांक एम.एच.०४ इ.एस. १२०९ या प्रवाशी गाडीचे मागिल सर्व शिट काढुन प्रवाशी वाहन असल्याने लोकांना संशय येणार नाही त्यामुळे जनावर चोरी साठी वापरून विविध ठिकाणावरून पाळीव जनावर गाय, बैल, बक-या चोरी केल्याचे कबुली दिल्याने १ ) पो.स्टे. बोरगाव मंजु अप.क्र. २२७/२०२२ कलम ३७९ भा.द.वि. २) पो.स्टे. बोरगाव मंजु अप.क्र.२३१/२०२२ कलम ३७९ भा.द.वि. ३) पो.स्टे. बार्शीटाकळी अप.क्र. ३७४ / २०२२ कलम ३७९ भा.द. वि. ४) पो.स्टे. उरळ अप.क्र.१७० / २०२२ कलम ३७९ भा.द.वि. ५) पो.स्टे. मुर्तीजापुर ग्रामीण अप.क्र.२२९/२२ कलम ३७९ भादवि व बिहाडमाथा येथुन ०४ जिवंत गोवंश असा एकुण ५,९०,०००/- रू मुददेमाल वरीलप्रमाणे जप्त करण्यात आले असुन आरोपी १) शेख इफराज शेख शकील वय २६ वर्षे रा. बिहाडमाथा महान ता. बार्शीटाकळी १२) शेख फिरोज शेख बिस्मीला वय ३८ वर्षे रा. शिवणी खदान, अकोला सध्या रा. बिहाडमाथा महान ता. बार्शीटाकळी यांना पो.स्टे. बोरगाव मंजू यांचे ताब्यात देण्यात त्यांचे कडुन रोख रक्कम ०४ जिवंत गोवंश एक तवेरा वाहन असा एकुण ५,९०,०००/- रू मुददेमाल जप्त करण्यात आला तसेच रेकॉर्ड वरील आरोपी नामे विशाल दुर्योधन इंगळे वय २२ वर्षे रा. निंबी पांडे ता. बार्शीटाकळी याचे कडुन पो.स्टे. अकोट शहर येथील अप.क्र. ४०६ / २०२२ मधील चोरीस गेलेली मोटार सायकल होन्डा शाईन एम. एच. ४९ बी.इ.४९०४ किं.अ. ५००००/- रू ची जप्त करून आरोपी पो. स्टे. अकोट शहर यांचे ताब्यात देण्यात आला. एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणुन नमुद आरोपी व मुददेमाल पुढील कार्यवाही कामी संबंधीत पोलिस स्टेशन येथे हस्तांतरीत करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. जी श्रीधर सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती मोनिका राउत मॅडम, पो. नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे मार्गदर्शना खाली पोउपनि गोपाल जाधव, पोहेकॉ. नितीन ठाकरे, नापोका गोकुळ चव्हाण, पो. का स्वप्निल खेडकर, पो.कॉ लिलाधर खंडारे, पो.कॉ शेख अन्सार, पो. कॉ. सुमीत राठोड, बालक. पो. कॉ. अक्षय बोबडे यांनी केली.