Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

हिम्मत असेल...तर 'गुरुजी' च्या क्लब वर धाड मारुन दाखवा


हिम्मत असेल...तर 'गुरुजी' च्या क्लब वर धाड मारुन दाखवा



लातूर-रेणापूर येथिल परवाना धारक रेणुका क्लब वर काहि दिवसापुर्वी चाकूर चे डि वाय एस पी निकेतन कदम यांनी धाड टाकून आता बसलेल्या ३९ जणांनवर अमाणुष मारहाण करण्यात आली होती,अशीच हिम्मत कोराळी ,ता.निलंगा कासारसिरशी हद्दीत कर्नाटक सिमेवर एका शेतात परवाना घेवून क्लब चालू आहे,त्यामध्ये आजुबाजुच्या शहरातील आणि कर्नाटकातूनही जवळ जवळ १००च्यावर लोक रोज येतात त्याठिकाणी धाड मारून दाखवा..!अशी उघड चर्चा सध्या लातूर शहरामध्ये होवू लागली आहे.
कोण आहे हा 'गुरुजी'..?
'गुरूजी' अशी ख्याती आहे की,मागील किमान २५ वर्षा पासुन मटका, जुगार राजरोस पणे चालवतो.मागील काहि वर्षा खाली लातूर मध्ये उघड जुगार चालवत असताना लातूर पोलिसांची धाड मारायची हिम्मत झाली नव्हती त्यावेळेस लातुरकरांनी केलेल्या तक्रारीनंतर सोलापुर येथुन तुषार दोशी साहेबांनी हिम्मत दाखवून कार्यवाही केली,परंतू कोणासही मारहाण केली नव्हती.आता तर लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापुर आणि कर्नाटकातूनही तो 'मटका' चालवतो त्यास जोड म्हणुन 'जुगारा'चा परवाना काढून त्याच लोकांना खेळण्यासाठी प्रवृत्त करतो.रोजचा धंदा किमान १करोड रूपये असल्याचे आता लपून राहिले नाही.किमान १००जन आपणास त्याठिकाणी भेटतील अशी शास्वती आहे.
आता पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे हे आपल्या 
सोबत असतील, तर आपणही 'गुरुजी' च्या क्लब वर धाड मारुन दाखवा..! मग आजूबाजूच्या शेतामध्येच काय? परवाना कढून पण कोणी बसायची हिम्मत करणार नाही. 
(चुकून शिरूर अनंतपाळ हद्दीत लिहिल्याबद्दल क्षमस्व:)
Previous Post Next Post