Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर पोलिसातर्फे आयोजित "एकता दौड" संपन्न ,पंधराशे जणांचा सहभाग


   
लातूर पोलिसातर्फे आयोजित "एकता दौड" संपन्न
पंधराशे जणांचा सहभाग
लातूर पोलिसातर्फे आयोजित "एकता दौड" संपन्न,शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातामध्ये दुर्दवी मृत्यु,13 मोटारसायकलीसह 6,30,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. दोन आरोपींना अटक,लातूर शहरात मोफत ५००० तिरंगा ध्वजचे वाटप.अखेर क्रिडा संकुलमध्ये तिरंगा ध्वज फडकला,दोन्ही आमदारांनी धरले नागरिकांना वेठीस 'लातूरकर' आणि आता 'औसेकर' पाण्यावाचून वंचित,स्वातंत्र्याचा'अमृत महोत्सव' निमित्त लातूर पोलिसातर्फे एकता दौडचे आयोजन,मुख्यमंत्री साहेब..... लातूर मधील 150फुट स्तंभ, तिरंगा ध्वजविना एकटाच उभा -रोज फडकत नाही कारण ऐकले तर अचंभित व्हाल..!, ,,‘










                   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. त्यातच अमृत महोत्सवी वर्षा निमित्त लातूर पोलीस दला तर्फे आज दिनांक 14 /08 /2022 रोजी सकाळी सात वाजता एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते. एकता दौडला नागरिकांनीही उस्फुर्त प्रतिसाद दिला.
            जिल्हाधिकारी श्री.पृथ्वीराज बी‌.पी. यांनी हिरवा झेंडा दाखवून दौड ला सुरुवात केली. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी देशभक्तिपर गीते वाजविली जात होती,तर ठिकठिकाणी नागरिक टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत होते. तर यावेळी विविध सेवाभावी संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते स्पर्धकांना लिंबू पाणी देऊन उत्साह वाढवित होते.
           लातूर जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित एकता दौड मध्ये पोलिसा सोबतच मोठ्या संख्येने लातूरकर ही सहभागी होऊन धावले.पुरुष, महिलांबरोबर लहान मुलेही एकता दौड मध्ये सहभागी झाली होती. एकता दौडचा यशवंत विद्यालयाच्या मैदानावर समारोप झाला.
               दहा किलोमीटर दौड मध्ये म्हाडा कॉलनीत राहणारी अकरा वर्षाची चिमुकली सानिया फिराेज पटेल याने प्रथम क्रमांक पटकाविला.तर पुरुष गटात पोलिस अमलदार 
1)सागर रामदास पाडळे,(शीघ्र कृती दल)
2)सोमनाथ एकनाथ डंबाळे, (शीघ्र कृती दल)
3)तानाजी व्यंकटराव पाटील पोलीस उपनिरीक्षक (लातूर ग्रामिण) यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
888
                  सकाळी सातच्या सुमारास 
यशवंत विद्यालयाच्या मैदानावर लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व आमदार तसेच नागरिक असे एकूण 1500 जणांचा सहभाग होता.त्यात पोलीस ट्रेनिंग स्कूल, बाभळगाव,भरतीपूर्व प्रशिक्षण इन्स्टिट्यूट, पोलीस मुख्यालय, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृति दल,जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच इतर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
                  एकता दौंड मध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना पोलीस दलातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी श्री.पृथ्वीराज बी.पी.अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद सुडके, जितेंद्र जगदाळे, संतोष गोसावी, दिनेश कुमार कोल्हे, डॅनियल बेन, यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा जाधव तसेच पोलीस निरीक्षक गणेश कदम, प्रेमप्रकाश माकोडे, संजीवन मिरकले, गोरख दिवे, दीपककुमार वाघमारे, चितांबर कामठेवाड ,सुरज गायकवाड ,राखीव पोलीस निरीक्षक गफार शेख,राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने, तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार या वेळी उपस्थित होते. 
               यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
              वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, आवेज काझी व त्यांच्या टीमने वाहतुकीचे योग्य नियमन केल्याने कुठल्याही अडथळ्यांविना, वाहतुकीची समस्या न उद्भवता एकता दौड पार पडली.
        महिलांमध्ये सानिया पटेल प्रथम.

              म्हाडा कॉलनीत राहणारी अकरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी सानिया पटेल हि एकता दौडची मुख्य आकर्षण ठरली. सानियाने पोलिसांच्या बरोबरीने एकता दौड मध्ये बरोबरीने धावली. दहा किलोमीटरच्या रूट वर कोठेही न थांबता सर्वांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. लातूर पोलिसांच्या वतीने सानियाला पुष्पगुच्छ, पुस्तक व प्रशस्तीपत्र भेट देऊन गौरविण्यात आले.
Previous Post Next Post