"श्री" च्या विसर्जन विहिरीची व मार्गाची पोलीस अधीक्षक श्री.निखिल_पिंगळे यांनी स्वतः पायी फिरून केली पाहणी
मागील 2 वर्षा पासून कोरोनामुळे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नाही, यंदा राज्य सरकार ने गणेश उत्सवा वरील सर्वप्रकारचे निर्बंध हटवल्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.त्याअनुशंगाने कोठेही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मंगळवार दि 23ऑगस्ट रोजी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने "श्री" च्या विसर्जन विहिरीची व मार्गाची पोलीस अधीक्षक श्री.निखिल_पिंगळे यांनी स्वतः पायी फिरून पाहणी केली. "श्री"ची स्थापना व विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्या करिता पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व संबंधितांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या...