महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेस प्रारंभ
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने सर्वसामान्य उद्योजकांच्या संकल्पनाना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेला सुरुवात झाली आहे.
तुमच्या डोक्यामध्ये काही छान छान संकल्पना आहेत, सतत काहीतरी क्रिएटिव्ह आणि वेगळं करण्याचं आपल्याला सुचत आणि त्यातून आपण काही नाविन्यपूर्ण कल्पना मूर्त स्वरूपात आणू इच्छीत असाल तर महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा लातूर जिल्ह्यामध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 17 ऑगस्ट 2022 ते दिनांक 20 ऑगस्ट 2022 हे चार दिवस ही यात्रा व्हॅनच्या स्वरूपात फिरणार आहे. त्यांच्या कार्याची रूपरेषा या विषयात संपूर्ण माहिती आपणास प्रदान करणार आहे. तसेच आपल्या कल्पना व योजना त्यांना आवडल्या तर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय अशा 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतची रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत. राज्यातील 6 विभागात ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे..
जिल्ह्यात 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान आयोजित स्टार्टअप यात्रेत आय.टी.आय. मध्ये शिकत असणाऱ्या व यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा. आपल्या संस्थेमध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार, दिलेल्या तारखेला आवर्जून हजर राहावे असे आवाहन औसा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या कु. रणभिडकर आय.टी यांनी केले आहे.