Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महानायक वसंतरावजी नाईक पुण्यतिथी निमित्त गुणगौरव सोहळा

Ads by Eonads
महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघ महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित

 महानायक वसंतरावजी नाईक पुण्यतिथी निमित्त गुणगौरव सोहळा 

 अकोला/ जिल्हा प्रतिनिधी



 अकोला जिल्हा बार्शीटाकळी तालुका येथे  दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघ च्या वतीने बार्शी टाकळी येथील प्रभू पार्वती मंगल कार्यालय येथे हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथीचे व सत्कार सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री हिरासिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते सदर कार्यक्रमात बंजारा समाजातील प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी व जिल्ह्याचे विशेषतः बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रमाणपत्र देऊन महंत जितेंद्र महाराज बंजारा समाज धर्मपीठ पोहरादेवी यांच्या हस्ते सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती रामसिंग जाधव , महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघाचे महासचिव जयकिशन जी राठोड, प्राचार्य मधुकररावजी पवार, गोर सेना विदर्भ अध्यक्ष मनोहर राठोड प्रमोद चव्हाण युवा उद्योजक दगड पारवा, रतन आडे गोरसेना जिल्हाप्रमुख, प्राध्यापक दिलीप चव्हाण जिल्हाध्यक्ष वाशिम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सत्कारमूर्ती अनिल राठोड उपविभागीय अधिकारी, अनिल चव्हाण कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अकोला, बाबूसिंग राठोड सेवानिवृत्त पीआय,सौ. संगीताताई जाधव उपसभापती पंचायत समिती बार्शी टाकळी, सुनील पवार उपाध्यक्ष नगरपरिषद मुर्तीजापुर, विनोद राठोड नगरसेवक बार्शीटाकळी, महादेवराव जाधव माजी सभापती, बाबू सिंग पवार मुर्तीजापुर ,चरण सिंग चव्हाण पातुर, नितीन जाधव मूर्तिजापूर, अजाबराव जाधव माजी सभापती, अशोक राठोड माजी सभापती, दिनेश राठोड युवा मोर्चा विदर्भ सचिव प्रामुख्याने उपस्थित होते . प्रास्ताविक अजाबराव जाधव यांनी केले महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघाचे कार्य व उद्देश प्रस्ताविकामध्ये त्यांनी मांडले महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघाचे महासचिव जयकिशन जी राठोड यांनी समाजाच्या समस्या सोडविण्याकरिता समाजाचे समाज कार्य करणारे समाज ज्येष्ठ नेते श्री हिरासिंग राठोड यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्याबाबतचा ठराव त्यांनी सभेत मांडला. सदर ठरावाला समाजाचे ज्येष्ठ नेते रामसिंग जाधव यांनी त्याला अनुमोदन दिले . येणाऱ्या काळामध्ये समाजाला योग्य न्याय देण्यासाठी हिरासिंग राठोड यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्य मागणीला धर्मपिठावरून पाठिंबा दिला त्याकरिता पुढील काळामध्ये ज्या काही घडामोडी कराव्या लागतील त्या सर्व धर्मपिठावरून करण्याचे महाराजांनी यावेळी आपल्या आशीर्वाद पर भाषणातून सांगितले समाजाची संस्कृती व समाजावर होणाऱ्या अन्याय दूर करण्याकरिता समाज बांधवांनी एकत्र येऊन लढा द्यावा असे विचार त्यांनी सभेत मांडले . विजय चव्हाण, सरपंच केवल राठोड , मनोहर राठोड, गोटू महाराज ,वसंतराव जाधव, बापूराव राठोड, रवी राठोड, गणपत जाधव,मनोज जाधव, नारायण पवार, ईश्वर जाधव, बाबूलाल राठोड, अरविंद राठोड, विजय चव्हाण पातुर,धनराज चव्हाण पातुर, अनिल जाधव मूर्तिजापूर, राजाराम राठोड, दमडूसिंग चव्हाण,प्रल्हाद चव्हाण ,अमरसिंग चव्हाण, गुलाब राठोड, उदय सिंग राठोड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉ संजय चव्हाण अकोला रमेश राठोड सेवानिवृत्त पोलीस ,उपस्थित होते. संचालन संदीप राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक राठोड यांनी केले.
Previous Post Next Post