लातूरच्या 'श्रीमंत गणेश उत्सव' मंडळाचा मुंबई,पुणे धर्तीवर आगमन सोहळा
लातूर- मागील 2 वर्षा पासून कोरोना संसर्गजन्य रोगामुळे गणेश उत्सव संबंध महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नाही, यंदा राज्य सरकार ने गणेश उत्सवा वरील सर्वप्रकारचे निर्बंध हटवल्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, याचाच भाग म्हणून लातूरचा श्रीमंत गणेश उत्सव मंडळाच्या वतीने वर्ष 2015 पासून मुंबई पुण्याच्या धरतीवर "श्री" च्या आगमनाची नाविन्यपूर्ण प्रथा मराठवाडा तसेच लातूर जिल्ह्यामध्ये या मंडळाने सुरवात केली आहे.याअभुतपुर्व आगमन सोहळयास 'माझं लातूर'परिवारास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.यावेळी सतिशजी तांदळे सर,प्रमोदजी गुडे,पिंटू निलंगेकर,काशिनाथ अप्पा बळवंते,प्रशांत मुसळे विष्णु आष्टीकर हे उपस्थित होते.
या अनुषंगाने "श्रीं"च्या आगमन सोहळ्याचा उत्साह व शोभा वाढवण्यासाठी दिनांक 24-8-2022 रोजी दु. 4 वा. बुधवार ठिकाण- महात्मा गांधी चौक येथून आगमन सोहळ्यास सुरवात होणार आहे; तरी या कार्यक्रमास लातूर मधील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे, हा आगमन सोहळा शहरातील विविध मान्यवर व सामाजिक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते व शहरातील सर्व गणेशउत्सव मंडळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. आगमन सोहळ्यामध्ये विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारे व संस्कृतीची जोपासना करणारे पथक आमंत्रित करण्यात आले असल्याचेही सांगीतले आहे.
मंडळाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी मंडळ उत्सव साजरा करत आहे (उदा. स्त्री सुरक्षा वर्ष, पोलीस सन्मान वर्ष ) याच पद्धतीने या वर्षी कोरोना संसर्गजन्य रोगात स्वतःची काळजी न करता पूर्णपणे नागरिकांची सेवा करणारे शहरातील सर्व मान्यवर डॉक्टर यांच्या सन्मानार्थ डॉक्टर सन्मानवर्ष 2022 या नावाने यंदाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे योजिले आहे.