दहिसर येथील दहीहंडी महोत्सवास मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांची उपस्थिति
आमदार प्रवीण दरेकर यांच्या दहिसर येथील शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून जमलेल्या समस्त गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.
राज्यात गोविंदाच्या खेळाला राजमान्यता मिळवून देण्याचे काम हिंदुत्ववादी युती सरकारने केले असून त्यामुळेच निर्बंधमुक्त वातावरणात दहीहंडी साजरी करता येणे शक्य असल्याचे यासमयी बोलताना सांगितले. गोविंदाच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिल्याने पुढील वर्षी प्रो_गोविंदा साजरा करता येणे शक्य होईल असेही याप्रसंगी नमूद केले.
यासमयी उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने राज्याच्या विकासाची आणि मुंबई मनपा निवडणुकीच्या विजयाची प्रतिकात्मक हंडी फोडली.
याप्रसंगी आयोजक आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार कृपाशंकर सिंग, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर तसेच मुंबईतील विविध विभागातून आलेले गोविंदा पथकं उपस्थित होती.