गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अर्धवट कामाचे करोड रुपये गुत्तेदाराच्या घशात..!आयुक्त साहेब..असेच पैशे वाया जाणार का..?
लातूर:जुने रेल्वे लाईन मार्गावर रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गाला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे.या रोड वर कमानीसाठी आणि डिव्हायडर साठी मनपा फंडातून काम लातूर मधील मां.अमित देशमुख यांचे निकटवर्ती गुत्तेदाराला देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.परंतू कमान अर्धवट बांधून तसेच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे.आता तर श्री देशीकेंद्र शाळेसमोरील उड्डान पुल ही पाडणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा पुल पाड़ला तर सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. आता मिनी मार्केटशेजारी जुन्या रेल्वे लाईनवर विलासराव देशमुख महामार्ग बांधण्यात आलेल्या अर्धवट कमानीचा काही भाग पाडण्यात आला असुन दरम्यान, रस्त्यात कमान आल्यामुळे ती पाडण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर मनपा फंडातून करोड़ों रुपये चे टेंडर स्थायी समीती मध्ये मंजुर करण्यात आले होते.मात्र गेल्या काही वर्षांपासून या कमानीचे काम रखडले आहेेे. काम पूर्ण झालेले नाही. आता या अर्धवट कामाचे करोड रूपए गुत्तेदाराच्या घशात जाणार का..?कमान पसंत नव्हती, तर अगोदर ती का बांधली, झालेल्या नुकसानीला व खर्चाला कोण जबाबदार.? याबाबत चौकशी व्हायला हवी.अशी चर्चा सध्या लातूर शहराच्या होवू लागली आहे.आयुक्त साहेब..लातूर च्या सर्वसामान्य जनतेचे असेच पैशे वाया जाणार का..? का आपण गुत्तेदाराकडून वसुल करणार? याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.