Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वाहतूक होमगार्डना विशिष्ट जॅकेटचे वाटप.

वाहतूक होमगार्डना विशिष्ट जॅकेटचे वाटप.
 गणेशोत्सवासाठी लातूर पोलीस सज्ज. वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त होमगार्डचा वापर...



             गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी लातूर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. सर्व पोलीसाच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
               गणपती आगमन आणि विसर्जन काळात वाहतूक नियमनासाठी व इतर बंदोबस्त करिता लातूर पोलिसांसह सुमारे १ हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलीस अकादमी नाशिक येथून दोन प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक,10 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक शिवाय पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव येथून एक पोलीस उपाधीक्षक तसेच 75 प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार तसेच एस आर पी एफ च्या दोन तुकड्या गणेशोत्सव बंदोबस्त कामी लातूर पोलिसांना देण्यात आलेले आहेत. 
            गणेश उत्सव काळात वाहतुकीची समस्या उद्भवू नये याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा लातूर तसेच उदगीर येथे अतिरिक्त होमगार्ड पुरविण्यात आले असून त्यांना वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य देण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रण करणाऱ्या होमगार्ड पटकन ओळखू यावे याकरिता आज रोजी लातूर पोलिसांकडून त्यांना पांढऱ्या जॅकेट देण्यात आले असून ते जॅकेट घालूनच सदरचे होमगार्ड वाहतूक नियंत्रणाचे काम करणार आहेत.
                   तसेच वरिष्ठ अधिकारी स्वत: गणेश उत्सव बंदोबस्तावर लक्ष ठेवणार असून यात शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक, राज्य राखीव दलाचा समावेश आहे.
               महत्त्वाच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात आले असून शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार आहे. गणेश मंडळांनाही मंडप परिसरात सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

स्थानिक मंडळांना पोलीस दिवसाकाठी तीन ते चार वेळा भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुले व महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
               एकंदरीत गणेश उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी लातूर पोलिसांनी जोरदार तयारी केलेली आहे.
Previous Post Next Post