लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
लातूर प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचे जनसेवेचे कार्य पुढे चालू ठेवून त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमीत्त रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त लातूर शहर व परीसरात ३१० पेक्षा अधिक रूग्णालयात महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज लातूर शहरातील पदमानगर येथील डॉ. राजकुमार दाताळ यांच्या सार्थक हॉस्पिटल येथे महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास भेट दिली. प्रारंभी आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आरोग्य सेवेच्या या उपक्रमादरम्यान डॉ. राजकुमार दाताळ यांच्या पद्मानगर मधील सार्थक रुग्णालयास भेट देऊन उपचारासाठी आलेल्या रुग्णांची अस्थेवायिकपणे चौकशी केली, महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणाऱ्या डॉक्टरांच्या विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लातूर येथील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय केला, आरोग्य शिबिराच्या आयोजनात सातत्य राखून सर्वसामान्य रुग्णांची सेवा केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, माजी महापौर दीपक सूळ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) लातूर जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, डॉ. वैशाली दाताळ, डॉ. अभय कदम, डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, डॉ. माधुरी कदम, सचिन दाताळ, डॉक्टर संजय जगताप, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. नितीन शितोळे, दत्ता सोमवंशी, विकास वाघमारे, हरिभाऊ भगत, प्रा.प्रवीण कांबळे, बालाजी वाघमारे, विजय टाकेकर आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, दाताळ कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.