बनावट देशी दारू तयार करणार्या कारखान्यावर छापा
अकोला जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई
अकोला /जिल्हा प्रतिनिधी
अकोला जिल्हा बेलोरा खुर्द येथे
पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या आदेशाने तसेच पथक अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी पेट्रोलिंग करीत असता गुप्त माहिती दाराकडून खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून बनावट देशी दारू बनवण्याचा व बनावट देशी दारू बाळगून विक्री करणारर्या कारखान्यावर विशेष पथकाचा बेलोरा खुर्द गावात छापा मारून आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली.
बनावट देशी दारू चा कच्चामाल स्पिरिट, सर्जिकल स्पिरिट, अल्कोहोल फ्लॉवर ,खाली बॉटल, झाकणे, सील, लेबलिंग पॅकिंग दोन मशीन व साहित्य बनावट दारूच्या 8 पेट्या जप्त केल्या तसेच खाली देशी दारू संत्रा टॅंगो पंच असा लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब अकोला जिल्ह्यातून हि कार्यवाही करण्यात आली
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब व यांच्या टीमने केली.