दंगलीच्या हल्यापासून लातूर पोलिस बचावणार... मिळाले "फूल बॉडी प्रोटेक्टर"
दंगलीच्या वेळी जमावाकडून होणारा हल्ला थोपविण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना ‘फूल बॉडी प्रोटेक्टर' देण्यात आले आहेत.
दंगली किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे काही ठिकाणी अचानक तणाव निर्माण होतो.हिंसक जमावाकडून पोलिसांचे रक्षण होण्याकरिता,पोलीस जखमी होऊ नये याकरिता पोलिसांसाठी ‘फूल बॉडी प्रोटेक्टर’ देण्यात आलेले आहे.
बंदोबस्तावर असलेल्या दंगा नियंत्रक पथकातील जवानांना तसेच पोलीस ठाणे स्तरावर ‘फूल बॉडी प्रोटेक्टर’ देण्यात आलेले आहेत.हलके मात्र सुरक्षित असल्याने सर्वच पोलीस ठाण्यातील पोलिसांना हे ‘फूल बॉडी प्रोटेक्टर ’युनिट वितरित केले गेले असून लातूर पोलिसा करिता एकूण 200 फुल बॉडी प्रोटेक्टर युनिट मिळाले आहेत.
वजनाने हलके आणि संपूर्ण शरीराचे रक्षण करणारे हे ‘बॉडी प्रोटेक्टर’ आतापर्यंत केंद्रीय राखीव दलाच्या जवानांसाठी वापरले जायचे. आता ते राज्य पोलीस दलालाही मिळाले असल्याने पोलिसांना दंगलीसारखी कायदा व सुस्थेची स्थिती हाताळताना चांगली मदत होणार आहे.
सदरचे फुल बॉडी प्रोटेक्टर घालून जिल्ह्यातील सर्वच ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी रूट मार्च केला आहे .