Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कृषिमंत्री अब्दुल सत्तार याना गोगलगाय भेट देण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकाना घेतले ताब्यात

कृषिमंत्री अब्दुल सत्तार याना गोगलगाय भेट देण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकाना घेतले ताब्यात




लातूर/औसा
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार सध्या मराठवाड्याच्या पिक पाहणीसाठी दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडामुळं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस (Maharashtra Government) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.रवीवारी २१ ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी आपल्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी यासाठी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार याना गोगलगायी भेट देण्यासाठी निघालेल्या औसा तालुक्यातील एरंडी सारोळा येथे शिवसैनिक पोहोचले असता काळे झेंडे (Black flags) दाखवण्याच्या तयारीत असलेल्या २८ शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. . यामधे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, औसा तालुका उपप्रमुख श्रीधर साळुंखे, नवनाथ लवटे, गणेश जाधव, मनोज सोमवंशी, सचिन पवार, अजित सोमवंशी, सुरेश मुसळे, श्रीराम कुलकर्णी, तानाजी सुरवसे, राहूल भोसले, शंकर कोहाळे, राजेन्द्र मातोळे यांच्यासह अनेक शिवसैनिकाचा समावेश होता



Previous Post Next Post