गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
देशी विदेशी दारू विक्री करणार्यावर छापा
विस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अकोला - दि, 06,08,22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या विशेष पथकास खत्रिशिर खबर मिळाल्यावरून पिंजर बसस्थानक जवळ असलेल्या सम्राट होटेलवर मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू विक्री केली जात होती त्या ठिकाणी 2 पंचासमक्ष छापा मारला असता होटेल सम्राट बस्टेण्ड पिंजर वर आरोपी सचिन लक्ष्मण इंगले वय 36 आणि मोतीराम विठ्ठल बूटे , वय 65 रा पिंजर यांच्याजवळ विदेशी दारू इम्पेरियल ब्लू च्या 51 बॉटल मेकडोवेल न1 च्या 44 बॉटल हायवर्ड 2000 बियर च्या 11 बॉटल, देशीदारु दारुच्या 51 बॉटल आशा एकुन देशीविदेशीदारु च्या 160 बॉटल कीमत 20,000रूपयांचा दारुचा मुद्देमाल बिनापरवान। बालगुन विक्री करताना मिळून आल्याने वरील 2 आरोपी विरुद्ध पो स्टे पिंजर येथे महाराष्ट्र दारुबन्दी कायदा कलम 65 ई अनवये गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे ,
सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्ये मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या पथकाने केली