१५ ऑगस्ट रोजी कोण करणार ध्वजारोहण..?
मुंबई :मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी तीन दिवसांनंतरही आजुन खातेवाटप होऊ शकले नाही.
मागील ३९ दिवस राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांचेच मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे. १५ ऑगस्ट पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला नाही आणि पालकमंत्री नियुक्त केले नाहीत तर जिल्हा मुख्यालयावर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे लागेल. आधीच मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिल्यामुळे शिंदे सरकारवर टीका होत आहे.
त्यातच ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करावे लागले तर सरकारवर पुन्हा टीका होऊ शकते. त्यामुळे, १५ ऑगस्ट पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून ही टीका टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात १५ ते २० मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो अशीही चर्चा आहे.खाते वाटपासाठी महत्त्वाच्या खात्यासाठी बंडखोर गट आणि भाजपात रस्सीखेच सुरू असल्याने खातेवाटप रखडल्याचे सांगितले जाते आहे. हे खातेवाटप आणखी लांबणीवर पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री असले तरी खातेवाटप झाले नसल्याने अद्याप पालकमंत्री नेमलेले नाहीत. परिणामी तात्पुरती सोय म्हणून १५ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहणासाठी १९ मंत्र्यांना गुरुवारी जिल्हेवाटप करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.तर मुख्यमंत्री मंत्रालयातील ध्वजारोहण करतील. तर उर्वरित १६ जिल्ह्यांत जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार असल्याचे समजले आहे.
Tags:
MUMBAI