गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
वझीरेक्स क्रिप्टो कंपनी ची ६४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने गोठवली
मोबाइल ॳॅप कर्जप्रकरण
मुंबई : मोबाइल ॳॅपवरून कर्ज देत सामान्य ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांनी, त्यांना होणारा नफा क्रिप्टो करन्सीद्वारे परदेशात फिरवण्यासाठी मदत केल्याप्रकरणी क्रिप्टो करन्सी उद्योगात लोकप्रिय असलेल्या वझीरेक्स कंपनीची ६४ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने शुक्रवारी गोठवली आहे.
मोबाइल ॲप कंपन्यांच्या माध्यमातून होणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या उलाढालीत मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग झाल्याचे
प्रकरण ईडीच्या तपासात उघड झाले. विशेष म्हणजे, या कंपन्यांना कर्जासाठी देण्यात येणारा पैसा हा चीन येथील कंपन्यांतून येत तपासात पुढे आले. असल्याचेही उघड झाले. मात्र, ग्राहकांकडून दामदुप्पट व्याज उकळल्यावर मूळ चिनी कंपनीला पैसे पाठविताना त्याचा स्रोत सापडू नये, यासाठी या कंपन्यांनी क्रिप्टो करन्सी मार्गाचा वापर केला. मोबाइल अॅप कंपन्यांना मिळालेल्या नफ्याच्या पैशांतून मोठ्या प्रमाणावर क्रिप्टो करन्सी घेतल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी गोठवली आहे.
याप्रकरणी क्रिप्टो करन्सी कंपन्यांची चौकशी सुरू केली. या दरम्यान वझीरेक्स या लोकप्रिय कंपनीचे नाव तपासात पुढे आल्याची माहिती मिळाली
ईडीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी वझीरेक्सच्या संचालकांना नोटिसा पाठवत त्यांच्या व्यवहारांचा स्रोत विशद करण्यास सांगितले होते. मात्र, कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना प्रतिसादही दिला नाही. त्यानंतर शुक्रवारी ईडीने कंपनीची मालमत्ता