शिवसेना- संभाजी ब्रिगेड युती
-उद्धव ठाकरे यांची घोषणा;
सर्व निवडणुका एकत्र लढणार
मुंबई : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मातोश्रीवर आयोजित पत्रपरिषदेत . केली. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज साखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यावेळी उपस्थित होते. आगामी सर्व निवडणुका एकत्रितपणे लढणार असे त्यांनी जाहीर केले.
• डोळ्यासमोर ठेवून झालेली नाही. तसे असते तर आताच्या काळात संभाजी ब्रिगेडचे नेते माझ्याकडे आले नसते, आम्ही सत्तेत होतो, सत्ता येणारच आहे पुढे, पण काही नसताना ते सोबत आले आहेत. लढताना जे सोबत येतात त्यांची साथ महत्त्वाची असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विषमतावादी व्यवस्थेला मूठमाती देण्यासाठी आणि लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी पुरोगामी पक्षांनी एकत्र आले पाहिजे म्हणून आम्ही शिवसेनेसोबत युती केली आहे, असे मनोज साखरे यांनी यावेळी सांगितले. आगामी सर्व निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढवू असे ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही इतिहास घडवू आणि मराठी माणसाला असलेल्या दुहीच्या शापालाच गाडून टाकू. आमची हिंदुत्वाविषयीची भूमिका रोखठोक आहे. महाराष्ट्राविषयीची भूमिका रोखठोक आहे. ती पटली म्हणून एकत्र आलो आहोत. यावेळी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणे, प्रादेशिक पक्ष, इतर पक्ष संपवून टाकणे यालाच लोकशाही म्हणणारे काही लोक हे आता बेताल बोलायला आणि वागायला लागले आहेत. अशा परिस्थितीत अनेक लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी, प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी एकत्र यायला हवे. त्यानुसार शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती झाली आहे.